यूपीएससीसाठी वयोमर्यादेचा कोणताही प्रस्ताव नाही

0
21

नवीदिल्ली – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी वयोमर्यादा निश्चित करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
नरेंद्र मोदी सरकार यूपीएससीची परीक्षा देणा-या उमेदवारांचे वय कमी करण्याच्या प्रस्तावावर विचार करत असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे स्पष्ट केले आहे.
वयोमर्यादा कमी करण्याऐवजी सरकारने ज्या उमेदवारांना परीक्षा पध्दतीतील बदलांमुळे परीक्षा देता आलेली नाही त्यांना आणखीं दोनवेळा परीक्षा देण्याची संधी दिली आहे, असे सरकारी प्रवक्त्याने सांगितले.
या निर्णयाचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जास्त फटका बसेल असे राजकीय पक्षांचे मत आहे. तत्कालीन मनमोहन सिंग सरकारही यूपीएससी परीक्षा देणा-या उमेदवारांची वयोमर्यादा कमी करण्याबद्दल गांर्भीयाने विचार करत होते. मात्र राजकीय परिस्थितीमुळे हा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही.