2 भाच्यांसह मामाचा धरणात बुडून मृत्यु

0
31

.धानोरा महासिध्द येथील हृदयद्रावक घटना…

बुलडाणा …. जळगांव जामोद तालुक्यातील धानोरा येथील लघु प्रकल्पात (हत्ती पाऊल धरणात) पोहोण्यासाठी गेलेल्या मामा व दोन भाच्यांचा बुडून करूण अंत झाल्याचे आज १८ मे रोजी सकाळी ७ वाजताच्या उघडकीस आले. यामुळे गाडगे कुटूंबियासह गावकरी अक्षरशः हादरले असून संपुर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
विनायक गाडगे, तेजस गाडगे धानोरा येथे आलेले त्यांचे मामा नामदेव वानखडे हे तिघे जण काल १७ मे रोजी दुपारी धानोरा लघु प्रकल्प परिसरात फिरायला गेले. कडक उन्हामुळे ते धरणातील पाण्यात पोहण्यासाठी उतरले.
मात्र संध्याकाळीच काय रात्री उशिरापर्यंत तिघे जण घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोध शोध सुरू केली. धरण परिसरात काल रात्री शोध मोहीम सुरू असताना त्यांचे कपडे व मोबाईल फोन धरणाच्या काठावर आढळून आले, तो पर्यंत खूप रात्र झाल्यानें अंधारात सदर मृतकांचा शोध लागला नाही. यामुळे आज सकाळीच नातेवाईक व गावकऱ्यांनी पुन्हा शोध सुरू केला असता पाण्यामध्ये त्या दुर्दैवी जीवांचे मृतदेह तरंगत असल्याचे निदर्शनास आले. पट्टीच्या पोहोणार्यांनी त्यांचे मृतदेह बाहेर काढले.