31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home Top News अंबाजोगाईजवळ बर्दापूर-अंबासाखर दरम्यान ट्रक-क्रुझरचा भीषण अपघात; सात ठार, 10 जखमी

अंबाजोगाईजवळ बर्दापूर-अंबासाखर दरम्यान ट्रक-क्रुझरचा भीषण अपघात; सात ठार, 10 जखमी

0
141

लातूर अंबाजोगाई महामार्गावर नंदगोपाल डेअरी नजीक आज सकाळी १० वाजताच्या सुमारास ट्रक आणि क्रुझरचा भीषण अपघात झाला. या अपघातात सात जण ठार तर १० जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे मावंद्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी लातूर जिल्ह्यातील साई आणि आर्वी येथून नातेवाईक क्रुझर गाडीतून निघाले होते. ते बर्दापूरच्या पुढे नंदगोपाल डेअरीजवळ आले असता त्यांच्या क्रुझरला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात क्रुझरमधील सात जण ठार झाले तर १० जण जखमी झाले आहेत.

blank

मृतांमध्ये निर्मला सोमवंशी (३८), स्वाती बोडके (३५), शकुंतला सोमवंशी (३८), सोजरबाई कदम (३७), चित्रा शिंदे (३५), खंडू रोहिले (३५, चालक) आणि अनोळखी एकाचा समावेश आहे. तर, राजमती सोमवंशी (५०), सोनाली सोमवंशी (२५), रंजना माने (३५), परिमला सोमवंशी (७०), दत्तात्रय पवार (४०), शिवाजी पवार (४५), यश बोडके (९), श्रुतिका पवार (६), गुलाबराव सोमवंशी (५०) आणि कमल जाधव (३०) हे दहा जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतात महिला आणि बालकांचा समावेश आहे.

blank