33.9 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत गोरेगांव येथील वाचनकुटीला सप्रेम भेट

वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत गोरेगांव येथील वाचनकुटीला सप्रेम भेट

0
57

blank

गोरेगांव,दि.23:- माजी समाजकल्याण सभापती विश्वजीत डोंगरे यांनी आपल्या वाढदिवसाच्यानिम्मिताने वायफळ खर्चाला फाटा देत गोरेगांव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनकुटीच्या विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढावी व संविधानाचे पुरेपुर ज्ञान मिळावे म्हणुन संविधान पुस्तकाच्या दोन प्रती पुस्तक व परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा तसेच वाचनकुटीतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी दहा खुर्च्या भेट स्वरुपात देऊन नाविण्यपूर्ण आदर्श उभा केला आहे.वाढदिवसाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी डोंगरे यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी जि.प.सदस्य डॉ. लक्ष्मण भगत, जि.प.सदस्या प्रितीबाई कतलाम, सरपंच राजेश्वरीबाई टेकाम, माजी पं.स.उपसभापती सुरेंद्र(बबलु)बिसेन,एपीओ पं.स.देवरी गौतम साखरे, नरेंद्र राहांगडाले व सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत माजी समाजकल्याण सभापती विश्वजीत डोंगरे यांचे वाढदिवस आगळे-वेगळे ,नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या स्वरुपात साजरे करण्यात आले.

blank