अखेर देवरीच्या सरपंचपदी संतोष मडावी

0
8
वाढदिवसाच्या शुभेच्छा

सरपंचपदाचा वाद मिटला
सरपंच-उपसरपंच यांच्यात दिलजमाई

देवरी- सरपंचपदाच्या राजकारणाला कंटाळून देवरीच्या ग्रामस्थांनी ग्राम पंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ग्रामसभेत निर्णय घेत गेल्या 29 तारखेला कुलूप ठोकले होते. या प्रकरणाची प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱयांनी घेत सरपंचपद हे संतोष मडावी यांना आज (ता.1) बहाल केले. उपसरपंच कृष्णदास चोपकर आणि सरपंच संतोष मडावी यांच्यात दिलजमाई झाल्याने सरपंच पदाचा वाद मिटल्याचा आनंद देवरीकरांनी साजरा केला.
सविस्तर असे की, गेल्या तीन महिन्यापासून देवरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाला घेऊन राजकारण चांगलेच तापले होते. हे प्रकरण अविश्वास प्रस्तावापर्यंत पोचले. सरपंच संतोष मडाली यांचेविरुद्ध अविश्वास प्रस्ताव पारित झाल्याने सरपंच मडावी यांनी त्या निर्णयाविरुद्ध अप्पर जिल्हाधिकारी यांचेकडे दाद मागितली होती.अप्पर जिल्हाधिकारी यांनी श्री मडावी यांचे अपील मान्य करून सरपंच पद बहाल केले. मात्र स्थानिक राजकारणामुळे मडावी यांचा विरोध कायम होता. दि. 29 तारखेला आयोजित ग्रामसभेत सरपंच कोण,या बाबीला घेऊन वातावरण चांगलेच तापले होते.याचे पर्यवसान ग्राम पंचायतीला कुलूप लावण्यापर्यंत पोचले होते. अखेर आज सोमवारला देवरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस एन मेश्राम यांनी लेखी आदेश दिल्याने सरपंचपद हे मडावी यांना पूर्ववत बहाल करण्यात आले.
वरिष्ठांचे पत्र मिळताच अखेर ग्राम पंचायतीला लावलेले कुलुप सरपंच संतोष मडावी, उपसरपंच कृष्णदार चोपकर, अधिकारी किशोर आचले, सदस्य ओमप्रकाश रामटेके, दिनेश भेलावे, सुशील जैन, माजी उपसरपंच परमजितसिंग भाटीया, बंटी भाटिया,शेखर कनोजिया आदी नागरिंकाच्या उपस्थितीत गणेश बिंझलेकर आणि महादेव लांडेकर या ग्रामस्थांच्या हस्ते उघडण्यात आले. उपसरपंच चोपकर यांनी श्री मडावी यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानाने सरपंचपदाच्या खूर्चीत बसविले.