छत्तीसगढमध्ये नक्षली हल्ल्यात १३ जवान शहीद

0
14
वाढदिवसाच्या शुभेच्छा

रायपूर-छत्तीसगढमधील सुकना जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) १३ जवान शहीद झाले. यामध्ये दोन अधिकाऱयांचाही समावेश आहे. गावकऱयांच्या आडोशाला लपून नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामध्ये १३ जवान शहीद झाले. शहीद झालेले सर्वजण सीआरपीएफच्या २२३ बटालियनचे जवान होते. यामध्ये एका डेप्युटी कमांडंट आणि असिस्टंट कमांडंटचाही समावेश आहे. या हल्ल्यानंतर अतिरिक्त पोलीस बळ घटनास्थळी पाठविण्यात आले असून, वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.