मुंबई:- राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेची सूत्र हाती घेतली आहेत. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राने राज्यात मोठा सत्तासंघर्ष पाहिला.शिवसेनेतील अंतर्गत बंडखोरीमुळे राज्यातील राजकीय चित्र पूर्णपणे पालटलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या ३९ आमदारांनी पाठिंबा दिला. हे सर्व ३९ आमदार आणि अपक्ष ११ आमदार सोबत घेऊन शिंदे महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडले. यानंतर ठाकरे सरकार कोसळले. भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मोठा इशारा दिला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना दीपक केसरकर म्हणाले कि, ज्या प्रकारची नोटीस एकनाथ शिंदे यांना सेनेकडून पाठवलं त्या संदर्भात आम्ही सेनेला रीतसर पत्र पाठवू. जर त्यांनी कारवाई मागे घेतली नाही तर आम्ही न्यायालयात जाऊन कारवाईचा प्रयत्न करू. असा इशारा त्यांनी दिला आहे. नेते पदावरून शिंदे यांना हटवला जातय हे लोकशाहीला शोभा देत नाही. सेनेच्या पक्षात असताना तुम्ही अफिडेबिट करून घेताय ? त्यांना दुसऱ्या पक्षात जायचा अधिकार असतो. असं देखील केसरकर म्हणाले.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना पक्ष पूर्णपणे विखुरला गेला आहे. उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घ्यावे, असं शिवसेनेच्या खासदारांना वाटत आहे. तशी मागणी या खासदारांनी उद्धव ठाकरे यांना बोलून दाखवल्याचं सांगितलं जात आहे. तसेच सेनेचे 14 खासदार वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचा दावा भाजपच्या एका नेत्याने केला आहे. यानंतर आता खासदार देखील शिंदेंना पाठींबा देणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
👉🟥👉एकनाथ शिंदेंची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी;👉👉 उद्धव ठाकरेंची कारवाई
गेल्या १० दिवसांपासुन सुरु असलेले बंड काल एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदावर येऊन थांबलेले असताना आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी मोठी कारवाई केली आहे.
👉👉शिंदे यांची शिवसेनेतील पदांवरून हकालपट्टी केली आहे. याबाबतचे पत्र व्हायरल झाले आहे.
👉🅾️👉तुम्ही पक्षविरोधी कारवाया करत आहात आणि स्वेच्छेने शिवसेनेचे सदस्यत्वही सोडले आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून माझ्याकडे असलेल्या अधिकारांचा वापर करून मी तुम्हाला पक्ष संघटनेतील शिवसेना नेते पदावरून काढून टाकत आहे, असे पत्र उद्धव ठाकरेंनी प्रसिद्ध केले आहे.
👉🔻👉या पत्राची एक प्रत राष्ट्रीय कार्यकारिणीला देखील देण्यात आली आहे. यामुळे शिंदे गट जो आम्हीच शिवसेना असल्याचा दावा करत आहे, त्यांना धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंनी सकाळीच शिंदे सरकार हे शिवसेनेचे नसल्याचे म्हटले होते. शिंदे सरकारवर कुठेही शिवसेना आणि पक्षप्रमुखांचा पाठिंबा असल्याचा उल्लेख नाहीय, यामुळे हे शिवसेनेचे सरकार नाही, असे ते म्हणाले होते. उद्धव यांनी गुरुवारी, ३० जूनलाच ही कारवाई केली आहे.