राज्यातील सत्तांतराच्या नाट्यानंतर आज विधानसभा अध्यक्षपदावरून राजकीय हमरीतुमरीचा दुसरा अंक पाहायला मिळत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी रविवारपासून बोलावलेल्या विशेष अधिवेशनाची सुरुवातच अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेच्या वादानेच होण्याची शक्यता आहे.
Live Update
- विधीमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाला ठीक 11 वाजता ‘वंदे मातरम’ गीताने सुरुवात झाली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचित आमदारांची सभागृहाला ओळख करुन दिली.
- विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्याची विनंती आम्हीदेखील राज्यपालांना केली होती. मात्र, ती त्यांनी मान्य केली नाही. आता ते नेमकी कशाची वाट पाहत होते हे लक्षात आले, असा टोला राष्ट्रवादीचे नेते जंयत पाटील यांनी लगावला. तसेच, आता राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची आम्ही पाठवलेली नावेही राज्यपालांनी तत्काळ मंजूर करावी, अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली.
- चंद्रकांत पाटील यांनी भाजप उमेदवार राहुल नार्वेकर यांचा प्रस्ताव मांडला, तर मविआकडून उमेदवार राजन साळवी यांचा प्रस्ताव मांडला.
- विधानभवनात दाखल होण्यापुर्वी एकनाथ शिंदे गटाकडून बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याला अभिवादन. एकनाथ शिंदेंसह सर्व बंडखोर आमदार विधानभवनात दाखल
- भाजप उमेदवार अॅड. राहुल नार्वेकर विधानभवनात दाखल. निवडणुकीपुर्वीच व्हिक्टरी साइन दाखवत विधानभवनात प्रवेश
- विधानभवनातील शिवसेनेचे कार्यालय सील केल्याने शिवसेनेचे सर्व आमदार हे शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या विधानभवनातील कार्यालयात बसले आहेत.
- शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना अतिरेक्यासारख कडेकोट बंदोबस्तात विधानभवनात आणले. विधानभवनात त्यांना कोणापासून धोका आहे, असा सवाल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला.
- निवडणुकीसाठी शिवसेनेचाच व्हीप अधिकृत. विधानभवनात आज नितीमत्तेची परीक्षा आहे. बंडखोर आमदारही मविआच्या उमेदवारालाच मत देतील, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
- निवडणुकीपुर्वी विधानभवनात काँग्रेस व भाजप आमदारांची बैठक. निवडणुकीबाबत प्रमुख नेत्यांचे मार्गदर्शन
- विधानसभा सभागृहात एकूण 9 कॅमेरे आहेत. त्यातील 8 कॅमेऱ्यांद्वारे विधानभवन सभागृहातील प्रत्येक कोपऱ्यात लक्ष ठेवले जात आहे आणि रेकॉर्डिंग केले जात आहे. तर एक कॅमेरा विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवरच लक्ष ठेवणार आहे.
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जवळपास सर्व आमदार भगवे फेटे घालून विधानसभेच्या सभागृहात दाखल.


दरम्यान, अधिवेशन सुरु होण्यापुर्वीच विधानभवनातील शिवसेनेच्या कार्यालयाला सील ठोकण्यात आले. यामागील नेमके कारण समजू शकले नाही. तर, विधानभवनात आज काही कार्यक्रम असल्याने आमच्या कार्यालयाला सील ठोकले असेल, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला.

आजपर्यंतची बिनविरोध अध्यक्ष निवडीची परंपरा मोडीत काढून यंदा भाजप-शिंदे गटाकडून अॅड. राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीतर्फे राजन साळवी या रिंगणात आहेत. शिवसेनेने सर्व आमदारांना व्हीप बजावला असून शिंदे गटाने सेनेच्या आदित्य ठाकरेंसह १६ जणांना व्हीप बजावला आहे. सकाळी ११ वाजता अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.
काँग्रेसचे नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यापासून रिक्त अध्यक्षपदाच्या निवडीसाठी निवडणूक होत आहे. ही निवड कुणाच्या नेतृत्वाखाली होणार येथूनच याचे नाट्य सुरू झाले आहे. मंत्रिमंडळ बरखास्त झाले असले तरी सभागृह अस्तित्वात असल्याने उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखालीच ही निवड होईल, अशी भूमिका महाविकास आघाडीने घेतली आहे, तर झिरवाळ यांच्यावर अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असल्याने राज्यपालांनी नेमलेल्या हंगामी अध्यक्षांच्या नेतृत्वात ही निवड व्हावी, अशी भाजपची भूमिका आहे. याबाबत दोन्ही घटकांकडून सर्व तांत्रिक व कायदेशीर बाबींची पडताळणी घेऊन नियोजन केले जात आहे.
Maha Assembly session begins to elect Speaker
Read @ANI Story | https://t.co/EOtgUCRzbb#MaharashtraAssembly #SpeakerElection #Maharashtra #Eknath_Shinde #MahaVikasAghadi #Devendra_Fadnavis pic.twitter.com/mZHKdcRjQ3
— ANI Digital (@ani_digital) July 3, 2022
एकनाथ शिंदेसह अमादारांना सेनेचा व्हीप
शिवसेनेतर्फे राजन साळवी यांनी अर्ज भरला आहे. निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंहसह शिवसेनेच्या आमदारांना मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीप बजावला असून साळवी यांना मतदान करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रभूंचा व्हीप आम्ही लागू नाही : शिंदे
सुनील प्रभू यांनी जारी केलेला व्हीप आम्हाला लागू होत नाही. आम्ही बहुमत चाचणीला सामोर जाणार आहोत. आमच्याकडे बहुमत असल्याने विजय आमचाच होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
भाजप व शिंदे गट
उमेदवार : अॅड. राहुल नार्वेकर- पूर्वाश्रमीचे शिवसैनिक, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे २०१४ मध्ये मावळ मतदारसंघातील उमेदवार, भाजप प्रवेशानंतर २०१९ मध्ये कुलाबा मतदारसंघाचे आमदार. पहिलाच कार्यकाळ असलेल्या नवोदित आमदारास भाजपकडून उमेदवारी.
#विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री @mieknathshinde यांचे आज सकाळी विधानभवन येथे आगमन झाले. यावेळी त्यांनी प्रथम विधिमंडळाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. pic.twitter.com/8Cy9Mxwz0G
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 3, 2022
एकूण मते : १६२ | भाजप – १०६,
शिंदे गट – ३९, बविआ – ३, रासप, जनसुराज्य, मनसे, प्रहार प्रत्येकी १, अपक्ष – १०
रणनीती : उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वात सभागृह चालवण्यास आक्षेप घेणार { राज्यपाल नियुक्त हंगामी अध्यक्षांचे नाव पुढे येेणार { ज्येष्ठ सदस्य या नात्याने भाजपचे कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती राज्यपाल हंगामी अध्यक्ष म्हणून करण्याची शक्यता
महाविकास आघाडी
उमेदवार : राजन साळवी – रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मतदारसंघातील शिवसेनेेचे तिसऱ्यांदा आमदार, रत्नागिरी नगर परिषदेत नगरसेवक, नगराध्यक्ष व जिल्हाप्रमुखपदाचा अनुभव.
एकूण मते : ११९ | राष्ट्रवादी ५३ (२ कोठडीत), काँग्रेस – ४४, शिवसेना – १६, शेकाप, सीपीआय, शेतकरी क्रांतिकारी पक्ष यांचे प्रत्येकी एक, अपक्ष – ३.(औरंगाबादच्या नामकरणानंतर समाजवादी पार्टीचे २ आणि एमआयएमचे २ असे ४ आमदार तटस्थ राहण्याची शक्यता)
रणनीती : मुख्यमंत्र्यांचा राजीनामा झाला असला तरी सभागृह अस्तित्वात असल्याची भूमिकाझिरवाळ यांच्या नेतृत्वात कामकाज करण्याची मागणी { खटला कोर्टात असल्याने झिरवाळांना नेतृत्व करण्याचा अधिकार असल्याचा दावा.
Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis and other BJP MLAs arrive at the State Assembly in Mumbai. pic.twitter.com/J3zgTzuDdG
— ANI (@ANI) July 3, 2022