35.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Top News आंबोली – हिरण्यकेशीतील घटना;सेल्फीच्या नादात विवाहिता पुराच्या पाण्यात कोसळली

आंबोली – हिरण्यकेशीतील घटना;सेल्फीच्या नादात विवाहिता पुराच्या पाण्यात कोसळली

0
22

blank

पोलीस अंमलदार दत्ता देसाई यांनी जीव धोक्यात फालून दिले जिवदान

सावंतवाडी  :सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरुन कणकवलीतील विवाहिता पुराच्या पाण्यात कोसळल्याची घटना आंबोली – हिरण्यकेशीत आज दुपारी घडली. जान्हवी शिंदे (२९) असे त्या महिलेचे नाव आहे. पुराच्या पाण्यात वाहून जात असताना सदर महिलेने प्रसंगावधान दाखवित नदीतील झाडीला पकडले. त्यानंतर त्यांच्या पतीने ११८ नंबर वर फोन करुन पोलीसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर आंबोली पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलीस कर्मचारी दत्ता देसाई यांनी आपला जीव धोक्यात घालत दोरखंडाच्या सहाय्याने त्या महिलेला बाहेर काढले. सदर महिला पती व मुलग्या समवेत आंबोलीत फिरायला आली होती. पोलीस कर्मचारी अभिजित कावळे, संभाजी पाटील, अमित गोते आदींनी मदतकार्यात सहभाग घेतला. शिंदे कुटुंबियांनी पोलीसांच्या कार्यतत्परतेबद्दल पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत.

blank