जपानच्या माजी पंतप्रधानांवर गोळीबार: प्रकृती चिंताजनक, हृदयविकाराचा झटकाही आला

0
12

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर शुक्रवारी सकाळी नारा शहरात हल्ला करण्यात आला. नारा शहरातील एका सभेत भाषण करत असताना त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. त्यात ते गंभीर जखमी झाले. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, त्यांच्या छातीत 2 गोळ्या लागल्या आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून, ते उपचाराला कोणताही प्रतिसाद देत नाहीत.

पोलिसांनी घटनास्थळावरून एका 42 वर्षीय हल्लेखोराला अटक केली आहे. त्याच्याकडून एक बंदूकही जप्त करण्यात आली आहे. पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत. हल्लेखोरांनी आबेंवर का गोळीबार केला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

हृदयविकाराचा झटकाही आला

जपानी माध्यमांनुसार, गोळी लागल्यानंतर शिंजो आबेंना हृदयविकाराचा झटकाही आला. पण, याविषयी अद्याप अधिकृत निवेदन आले नाही. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, घटनास्थळी गोळीबार झाल्यानंतर आबेंच्या शरीरातून रक्तस्त्राव होत असल्याचे दिसून आले. जपानमध्ये रविवारी वरिष्ठ सभागृहाची निवडणूक होणार आहे. शिंजो आबे या निवडणुकीसाठी प्रचार करत होते.

गोळी लागल्यानंतर नागरिकांनी शिंजो आबे यांना तत्काळ रुग्णालयात हलवले.67 वर्षीय शिंजो 2006 ते 07 पर्यंत जपानचे पंतप्रधान होते.
गोळी लागल्यानंतर नागरिकांनी शिंजो आबे यांना तत्काळ रुग्णालयात हलवले.67 वर्षीय शिंजो 2006 ते 07 पर्यंत जपानचे पंतप्रधान होते.
हे छायाचित्र नारा सिटीतील यामातोसैदाईजी स्थानकालगतच्या एका चौकातील आहे. शिंजो आबे येथेच प्रचारसभा घेत होते.
हे छायाचित्र नारा सिटीतील यामातोसैदाईजी स्थानकालगतच्या एका चौकातील आहे. शिंजो आबे येथेच प्रचारसभा घेत होते.

कोण आहेत शिंजो आबे?

67 वर्षीय शिंजो लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (एलडीपी) पक्षाचे नेते आहेत. ते 2006-07 दरम्यान पहिल्यांदा जपानच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. आबे एक जपानचे एक आक्रमक नेते आहेत. त्यांना अल्सरट्रेटिव्ह कोलायटिस हा एक आतड्याचा आजार होता. यामुळे त्यांना 2007 मध्ये पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. शिंजो आबे सलग 2803 दिवस (7 वर्षे 6 महिने) पंतप्रधान होते. यापूर्वी हा विक्रम त्याचे काका इसाकू सैतो यांच्या नावावर होता.

डिसेंबर 2012 च्या निवडणुकांमध्ये लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचा मोठा विजय झाला. त्यानंतर पुन्हा आबे जपानच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले.