सोन्याच्या साडीनं ही देवी सजली;16 किलो सोन्याची साडी

0
20

पुणे:-आज विजयादशमीनिमित्त राज्यभरात उत्साहाच वातावरण आहे. नवरात्राच्या समाप्तीनंतरही पुण्यातील एक देवी सध्या भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे.सारसबाग येथील महालक्ष्मीला सोन्याची साडी नेसवण्यात आली आहे. ही साडी पाहण्यासाठी आजूबाजूच्या भाविकांची मंदिरात गर्दी होत आहे.

दसऱ्यानिमित्त सारसबाहेरील महालक्ष्मीला 16 किलो वजनी सोन्याची साडी नेसवण्यात आली आहे. साडीसोबत देवीला सुवर्ण अलंकारांनी सुशोभित करण्यात आलंय.देवीचं सुवर्णमयी रुप डोळ्यांचं पारणं फेडणारं ठरतंय. मागील वर्षीदेखील विजया दशमीला महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी नेसवण्यात आली होती.

पुण्यातील सारसबाग येथील हे महालक्ष्मी मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे. मंदिरातली ही मूर्ती राजस्थानमध्ये बनवण्यात आली आहे.ही मूर्ती घडवण्यासाठी मूर्तिकाराला तब्बल 12 वर्षांचा कालावधी लागला होता, असे म्हटले जाते. या मंदिरात महालक्ष्मीसोबतच सरस्वती आणि कालीमातेच्याही मूर्ती आहेत.