महाराष्ट्र द्रोह्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ- उद्धव ठाकरे

0
19

सरकार आंधळ, बहिर, मुक आणि पळकुट; 👉🟥👉महामोर्चात छगन भुजबळ यांचा हल्लाबोल

👉🔴🔴👉’…तर महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही, पेटून उठल्याशिवाय राहणार नाही’, 👉🅾️👉महामोर्चातून शरद पवारांचा इशारा

मुंबई:-महाराष्ट्र द्रोह्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्यानंतर पहिल्यांदाच सर्वात मोठा लढा उभारला आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पण अजूनही बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालेला नाही.तो घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबई येथे शनिवार (दि. १७) महाविकास आघाडीच्यावतीने महामोर्चा काढण्यात आला. या वेळी आयोजित सभेत ते बोलत होते.

या वेळी उद्धव ठाकरे म्‍हणाले, “आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राला डिवचले त्यांच्या छाताड्यावर चालण्याची हीच वेळ आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्यानंतर पहिल्यांदाच अस दृष्य देशाने आणि जगाने पाहिलं असेल. कोणीही यायचं आणि डिवचून जायचं हे आता चालणार नाही. या मोर्चात सर्वपक्षीय झेंडे एकवटले आहेत. फक्त महाराष्ट्र द्रोही या मोर्चात नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार खुर्चीसाठी दिल्लीसोबत लाचारी करणारे नव्हते. खुर्ची गेली तरी चालेल; पण महाराष्ट्राच्या अस्मितेशी तडजोड होऊ देणार नाही. असा कोणी प्रयत्न करेल त्याला गुडघ्यावर झुकण्यासाठी लावणारी ही खरी शिवसेना आहे, असेही ठाकरे यांनी ठणकावले.

राज्यपाल राष्ट्रपतींचे दूत असतात; पण त्याचा कोश्यारींना विसर पडलाय, असेही ठाकरे म्‍हणाले. सध्याचे पालकमंत्री मुंबईचा हिशेब स्क्वेअर फूटामध्ये करतात.या सरकारमध्ये बौद्धीक दारिद्य्र असलेले मंत्री आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याचा त्यांना अधिकार नाही, असेही ठाकरे म्‍हणाले.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर बऱ्याच वर्षांनंतर महाराष्ट्रानेच नव्हे तर संपूर्ण भारताने एवढा मोठा मोर्चा देशाने पाहिला असेल, मोर्चाची घोषणा केली तेव्हा मला काही जणांनी विचारलं तुम्ही एवढे चालणार का? मी म्हटलं मी एकटा नाही, माझ्यासोबत लाखो महाराष्ट्रप्रेमीही चालणार. आणि नुसते चालणारच नाही, तर महाराष्ट्रद्रोह्यांच्या छाताडावर चालणार आहेत. आजवर ज्यांनी ज्यांनी आपल्याला डिवचलं, त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ आली आहे.संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर हा सर्वात मोठा मोर्चा आज पाहिला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पण अजून बेळगाव निपाणी कारवार बाकी आहेत आणि हे देखील घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आज सर्वपक्षांचे झेंडे इथे एकवटलेत. ही महाराष्ट्राची ताकद आहे.राज्यपालांच्या खुर्चीवर कोणीही बसावं आणि काहीही बोलावं हे महाराष्ट्र सहन करणार नाही. कोश्यारींना आम्ही राज्यपाल मानत नाही, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले नसते तर आज आपण कुठे असतो. त्याचं एक उदाहरण आपल्या मंत्र्यांनी ‘भीक’ शब्द वापरून दाखवून दिलं आहे. जर त्यावेळी सावित्रीबाईंनी शेणाचा मार सहन केला नसता. त्यांच्यामुळे आपण शाळेत गेलो. आपण तसे गेलो नसतो, तर आपणही यांच्यासारखे मंत्री बनून अशी शाब्दिक भीक मागत बसलो असतो. हीवैचारिक, बौधिक दारिद्र असलेले हे लफंगे लोक आहेत. यांना छत्रपतीचं नाव घेण्याचा या लफंग्यांना अधिकार नाही.

नाना पटोले- राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काही कारवाई करतील असं वाटलं होतं, पण नागपूरच्या कार्यक्रमात ते सोबत बसलेले राज्याने पाहिले. भाजप या देशाचे तुकडे करु पाहत आहे. या महाराष्ट्र द्रोही सरकारच्या विरोधात आपण एकत्र आलो, पण या मोर्चाला विरोध करायचा म्हणून त्यांनीही मोर्चे काढले. पण या महाराष्ट्रद्रोह्यांना मातीत गाडल्याशिवाय महाराष्ट्राची जनता स्वस्थ बसणार नाही.

संजय राऊत- महाराष्ट्राच्या राज्यपालांना डिसमिस केल्याचे सांगणारा हा महामोर्चा आहे. शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही. राज्यपालांना एक मिनिटसुद्धा खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. हे राज्यातील सरकार उलथवून टाकण्यासाठी टाकलेले पहिलं पाऊलं आहे. महाराष्ट्र्ची जनता हे सरकार उधळुन टाकण्यासाठी एका संधीची वाट पाहत आहे. यापुढे गावागावात असे मोर्चो निघतील. सर्व पक्ष या मोर्चात सहभागी झाले आहेत. तुम्हाला जमत नसेल तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आमच्या ताब्यात द्या, असे आवाहन खासदार संजय राऊत यांनी केले.

राज्यात बेरोजगारी महागाई प्रचंड वाढत आहे. तसेच दररोज महापुरुषांचा अपमान केला जात आहे. त्यावर सरकार गप्प बसले आहे. हे सरकार आंधळ, बहिर, मुक,आणि पळकुट असल्याचा हल्लाबोल छगन भुजबळ यांनी केला.महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, माजी मुख्यमंत्री उध्वव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. महागाई, बेरोजगारी, पळविलेले उद्योगधंदे, महापुरुषांचा होत असलेला अवमान असे विविध प्रश्न हाती घेत महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. या महामोर्चात नाशिकहून तयार केलेल्या महापुरुषांच्या चित्ररथांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या आंदोलनात छगन भुजबळ यांनी अग्रभागी सहभागी होत सरकार विरोधात हल्लाबोल केला.

👉🅾️👉छगन भुजबळ यांनी शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास नागपाडा येथे मोर्चा स्थळी नियोजनाची पाहणी करत सहभागी मोर्चेकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर मोर्चात सहभाग घेतला. यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, राज्यात रोजगार देणारे उद्योग पळविले जात आहे. सीमा प्रश्नावर नको ते प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्रातील गावांवर हक्क सांगितला जात आहे. राज्यात बेरोजगारी महागाई प्रचंड वाढत आहे. तसेच दररोज महापुरुषांचा अपमान केला जात आहे. त्यावर सरकार गप्प बसले आहे. हे सरकार सरकार आंधळ, बहिर, मुक,आणि पळकुट असल्याचा हल्लाबोल छगन भुजबळ यांनी केला.

दरम्यान महाविकास महामोर्चात नाशिकहून महापुरुषांचे चित्ररथ नेण्यात आले होते. या मोर्चाच्या अग्रभागी महापुरुषांचे चित्ररथ ठेवण्यात आले होते. या चित्ररथांचे सर्व नियोजन नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी केले. महामोर्चाच्या अग्रभागी असलेल्या या चित्ररथांनी सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी मोर्चेकऱ्यानी महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात हल्लाबोल करत महापुरुषांच्या नावाच्या घोषणा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या वतीने होणाऱ्या हल्लाबोल मोर्चामध्ये नाशिक जिल्ह्यातील शहरातले हजारो कार्यकर्ते सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त करताना प्रतिक्रिया दिली, या भाजप नेत्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला छळवून सोडलेले आहे, नको ते वक्तव्य सरकारमधल्या राज्यपालांपासून मंत्र्यांपर्यंत सगळे लोक करत आहेत. महाराष्ट्रात महागाई, बेरोजगारीचा मोठा प्रश्न असताना अशाप्रकारे ठिकाणी स्त्रियांचा अनादर केला असल्याचे राज्यपालांची हकालपट्टी करा अशी मोर्चाद्वारे करण्यात आली.

👉🟣👉महामोर्चात महापुरुषांचे चित्ररथ…

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहर व जिल्ह्यातील हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते महामोर्चात सहभागी झाले. नाशिक शहरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, काँग्रेसचे कार्यकर्ते मुंबई मोर्चात सहभागी झाले. यावेळी नाशिकहून महापुरुषांचे चित्ररथ नेण्यात आले, जे कि महामोर्चात अग्रभागी ठेवण्यात आले होते.

👉’…तर महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही, पेटून उठल्याशिवाय राहणार नाही’, 👉🅾️👉महामोर्चातून शरद पवारांचा इशारा

राज्यपालांसह भाजपाच्या नेत्यांकडून झालेल्या महापुरुषांच्या अपमानाविरोधात आज महाविकास आघाडीने काढलेल्या महामोर्चाला जोरदार प्रतिसाद मिळाला.या मोर्चात नेत्यांसह लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्य़ान, या मोर्चाला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली. तसेच महापुरुषांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना परखड शब्दात इशारा दिला.शरद पवार सभेला संबोधित करताना म्हणाले की, आज हे लाखोंच्या संख्येने शक्ती एकत्र का आली. त्याचं कारण आहे महाराष्ट्राच्या सन्मानासाठी. महाराष्ट्राच्या सन्मानावर हल्ले होत आहे. आज सत्तेवर बसलेले लोक महाराष्ट्राच्या नेतृत्वाविषय, महाराष्ट्राच्या युगपुरुषांविषयी एक वेगळ्या प्रकारची भाषा वापरत आहेत. संपूर्ण भारताला आत्मविश्वास देण्याचं ऐतिहासिक काम शिवछत्रपतींनी केलं आहे. या देशात अनेक राजे होऊन गेले. अनेकांची संस्थानं झाली. मात्र साडेतीनशे वर्षांनंतर जनतेच्या सामान्य लोकांच्या ओठावर एक नाव कायम आहे ते म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज होय. त्या शिवछत्रपतींचा उल्लेख राज्यातील एकादा मंत्री करतो. अन्य कुणी सत्ताधारी पक्षाचे घटक करतात. हे महाराष्ट्र सहन करणार नाही. यासंबंधीची तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी लाखोंच्या संख्येने तुम्ही येथे आला आहे. आज तुम्ही इशारा दिला. त्यातून राज्यकर्त्यांनी बोध घेतला नाही तर लोकशाहीच्या माध्यमातून काय धडा शिकवायचा हे दाखवल्याशिवाय महाराष्ट्र स्वस्त बसरणार नाही, असा इशारा शरद पवार यांनी दिला.

शरद पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्राची काही वैशिष्ट्ये आहेत, काही सन्मानचिन्हे आहेत. महात्मा फुले असोत, शाहू महाराज असो, डॉ. आंबेडकर असोत, कर्मवीर भाऊराव पाटील असोत, ही आमची सन्मानाची, आदराची स्थाने आहोत. आजचे राज्यकर्ते याबाबत काय बोलतात. महाराष्ट्राच्या इतिहासात असे राज्यपाल कधी पाहिले नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेत जाऊन मला ५५ वर्षे झाली. या काळात अनेक राज्यपाल पाहिलेत. त्यांनी महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवण्याचं काम त्यांनी केलं. मात्र यावेळी एक अशी व्यक्ती या ठिकाणी आणली जी महाराष्ट्राच्या विचारधारेला संकटात आणण्याचं काम करत आहे. महात्मा फुले असो, सावित्रिबाई असोत. त्यांच्याबाबत अनुदगार काढतेय, त्यांना लाज वाटली पाहिजे. अशा व्यक्तींची टिंगल टवाळी करत असतील, तर राज्यपालांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे या मोर्चाच्या माध्यमातून मी केंद्राला आवाहन करतो की, यांची हकालपट्टी लवकरात लवकर करा. जर वेळीच हकालपट्टी केली नाही तर महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शरद पवार यांनी दिला.यावेळी वादग्रस्त विधानांच्या मुद्द्यावरून भाजपाच्या अन्य नेत्यांवरही टीका केली. ते म्हणाले की, मला गंमत वाटते या राज्यकर्त्यांमध्ये एक स्पर्धा सुरू झालीय. ती स्पर्धा कर्तृत्वाची नाही, महाराष्ट्राच्या विकासाची नाही तर महाराष्ट्राच्या बदनामीची स्पर्धा सुरू आहे. याठिकाणी एका मंत्र्याने उल्लेख केला की, कुणीतरी शिक्षण संस्था चालवायची असेल तर तुम्ही भीक मागा म्हणून, यावेळी त्यांनी नावं घेतली कुणाची तर महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांची. कर्मवीरांनी लाखो विद्यार्थ्यांना शिकवले. वसतीगृहे काढली. अशा व्यक्तींविरोधात कुणीतरी गलिच्छ शब्द वापरत असेल, तर त्यांना धडा शिकवण्याचं काम तुम्हाला करावं लागेल, असे आवाहन शरद पवार यांनी केलं.