शासकीय जीप चोरणारे अटकेत,मात्र जीपचे साहित्य भंगारात कापणारा भंगारवाला मोकळा?

0
47

गोंदिया,दि.18ः- येथील शहर पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या सिव्हीललाईनस्थित बोळीजवळील नगरपरिषदेच्या जागेत असलेल्या शासकीय वाहनाला जेसीबीच्या माध्यमातून उचलून नेत कबाडीला विकण्याचा प्रयत्न करणा-या टोळीला गोंदिया शहर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.मात्र ज्या भंगारवाल्याकडे हे शासकीय वाहन कापले जात होते,त्या भंगारवाल्याकडून साहित्य हस्तगत करण्यात आले,मात्र त्या भंगारवाल्याला अटक करण्यात आल्याचे कुठेच उल्लेख पत्रकात नसल्याने त्या भंगारवाल्याला का सोडण्यात आले अशा चर्चांना उधाण आले आहे.

शासकीय वाहन उचलून नेत ते विकण्याचा प्रताप करणार्या टोळीमूळे शहरात अनेक ठिकाणी शासकीय वाहने भंगारवस्थेत पडून असल्याने त्यांची विल्हेवाट तर अशाप्रकारे कबाडींच्या माध्यमातून लावली जात नाही ना असा प्रश्न उपस्थित झाला असून पोलिसांना काही विशेष कबाडीव्यवसायिकांच्या सखोल चौकशीची गरज झाली आहे.

शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कार्यालय सहा. आयुक्त मत्स व्यवसाय, (तांत्रीक) गोंदिया, यांचे कार्यालयीन उपयोगा करीता सन 1995 पासुन वापरात असलेली व सन 2012 पासुन नादुरुस्त असलेली महीन्द्रा कंपनीची कमांडर जिप, वाहन क्रं. MH.35 / A 9968 ही कार्यालयाचे जुने ठिकाण बोहरा यांचे घरी, इंगळे चौक गोंदिया येथील कार्यालयाचे मागील नगर परिषदेच्या मोकळ्या जागेत उभी करून ठेवलेली होती.मात्र कुणीतरी अज्ञात चोरांनी ते वाहन चोरी केल्याचे सौ.चित्रांगणा केवळराम सलामे (रा. डोंगरगाव, सडक/अर्जुनी) यांच्या तक्रारीवरून 09/12/2022 रोजी पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथे अपराध क्रं. 780/2022 कलम 379 भादंवि अन्वये अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.या प्रकरणात पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदारानी चित्रीकरणाच्या आधारे गुन्ह्यांतील चोरीस गेली गाडी ही चित्रीकरणामध्ये गुरमितसिंग भाटीया क्रेनच्या साह्यानं ACE कंपनीची कमांडर हॉयड्रा (क्रेन) 14 XM सेंद्री रंगाचा वाहन क्रं. MH.35/AR 1827 ज्यावर गुरमीतसिंग भाटीया क्रं. 4 असे लिहीलेले किं. अं.12,00000/- रुपये क्रेन मालक यांचे कार्यालयात काम करणारे मॅनेजर नामे रमेश यशंवतराव गौतम वय 51 वर्षे, रा. गजानन कॉलोनी शास्त्री यांचे कडून हस्तगत केली.तसेच या गुन्हयात अमित रामचंद्र धनखड, वय 37 वर्षे, रा. सिव्हील लाईन, माता मंदीर चौक, बोडी जवळ गोंदिया यांच्याकडे करण्यात आलेल्या तपासामध्ये जावेद शेख,रा.सिव्हील लाईन,गोंविंदपुर गोंदिया व संजु नायर,रा. सिव्हील लाईन गोंदिया यांचा सहभाग असल्याचे निष्पण झाल्याने या दोघांनाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडे विचारपूस करून तपास केला असता त्यांनी चोरीस गेलेली जीप ही भंगारमध्ये असल्याचे सांगितल्याने भंगारवाल्याकडे असल्याचे सांगण्यात आले.जेव्हा पोलिसांचे पथक हे भंगारवाल्याकडे पोचले असता त्या चारचाकी जिपचे इंजिन गेअर बॉक्ससह,चार डिक्स टायरसह,मागचा गुल्ला
,समोरचा गुल्ला तीन तुकडे,दोन कमानी,एक सापट,सायलेंसरचे ३ तुकडे व प्लॉस्टिक डॅश बोर्ड असे सुटे भाग मिळुन आल्याने हस्तगत करण्यात आले.सदर गुन्हयाचा तपास स.पो.नि. सागर पाटील, पो.स्टे. गोंदिया शहर हे करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक अशोक बनकर,उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल ताजणे,यांचे निर्देशांन्वये व मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक चंद्रकांत सुर्यवंशी, यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स.पो.नि. सागर पाटील, पो.हवा. जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, मपोहवा. रिना चौव्हाण, पोहवा. अरविंद चौधरी, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, ओमेश्वर मेश्राम, सुबोध बिसेन, पो.ना.दिपक रहांगडाले, पोशि. विकास वेदक, पुरुषोत्तम देशमुख, दिनेश बिसेन, मुकेश रावते, कुणाल बारेवार यांनी केली आहे.