राहुल गांधींचा यात्रा रोखण्यास नकार:म्हणाले -मास्क लावा…कोविड वाढतोय, हे सर्व बहाणे; काहीही झाले तरी काश्मीर गाठणार

0
15

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा रोखण्यास नकार दिला आहे. ते म्हणाले – केंद्र सरकारने आता नवा फॉर्म्युला काढला आहे. मला पत्र पाठवले आहे. त्यात मास्क घाला, कोविड पसरतोय असे सांगण्यात आले आहे. हे सर्व यात्रा रोखण्याचे बहाणे आहेत. भारताच्या वस्तुस्थितीला हे लोक घाबरलेत. आमची यात्रा काश्मीरपर्यंत जाईल.

उल्लेखनीय बाब म्हणजे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी राहुल गांधी यांना पत्र लिहून भारत जोडो यात्रा रोखण्याचे आवाहन केले होते. ते म्हणाले होते – देशात पुन्हा एकदा कोरोनाचे संकट वाढत आहे. आरोग्य आणीबाणीची स्थिती उद्भवल्यामुळे देश वाचवण्यासाठी भारत जोडो यात्रा थांबवण्याची गरज आहे.

राहुल गांधींचा 106 दिवसांपासून पायी प्रवास, पायाला पट्टी बांधली

काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या राजस्थानातून हरियाणात पोहोचली आहे. राज्यातील यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे. राहुल गांधी नूंहच्या ऐतिहासिक गांधीग्राम (घासेरा) पोहोचले. तिथे त्यांच्या पायाला पट्टी बांधल्याचे दिसून आले. राहुल मागील 106 दिवसांपासून पायी प्रवास करत आहेत. घासेरा गावच्या ग्रामस्थांनी मेवाती पगडी घालून त्यांचे स्वागत केले.

1. आम्ही कुणाचाही धर्म विचारत नाही

राहुल गांधी येथे म्हणाले – यात्रेत आम्ही 100 दिवसांहून जास्त दिवस चाललो. त्यात हिंदू, मुस्लिम, शिख व ख्रिश्चन सर्वजण चालत आहे. यापैकी कुणीही कुणाचा द्वेष केला नाही. कुणाचा धर्म विचारला नाही. जात विचारली नाही. सर्वांनी एकमेकांचा सन्मान केला. गळाभेट घतेली. काल आमचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पडले. त्यांना सर्वांनी धरून उठवले. कुणीही तू कोणत्या जाती-धर्माचा आहेस हे विचारले नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व नरेंद्र मोदींचा द्वेषाचा भारत प्रत्यक्षात आला नाही पाहिजे.

2. संसदेत माइक बंद करतात

संसदेत सत्ताधारी आमचा माइक ऑफ करतात. त्यामुळे आम्हाला कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत ही यात्रा काढावी लागली. या यात्रेमुळे मी अनुभवसंपन्न झालो. कार व हेलिकॉप्टरमधून जे शिकण्यास मिळाले नाही ते येथे शिकण्यास मिळाले. मला खोटे बोलणे आवडत नाही. वेळ लागेल, पण आम्ही करून दाखवू. खरे बोलणाऱ्या सरकारची गरज आहे. महागाई, बेरोजगारीसाठी मोदींशी चर्चा करावी लागेल. लोकसभेत आमचे बोलणे ऐकले जात नाही. सत्ताधारी देशात भीती व द्वेषाचे वातावरण तयार करण्याची वल्गना करत आहेत.

3. मोदींना आव्हान दिले की ते पळ काढतात

नरेंद्र मोदींचे चारित्र्य तुम्हाला समजून घ्यावे लागेल. त्यांच्यापुढे कुणी उभे टाकले की नरेंद्र मोदी उलट्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न करतात. ते सामना करताना पळून जाण्याचा प्रयत्न करतात हे तुम्हाला लक्षात घ्यावे लागेल. सर्वांवर अंकुश लावण्यात आला आहे. त्यामुळे ते कधीही माध्यमांपुढे येत नाहीत. हे संघाच्या सर्वच स्वयंसेवकांची गोष्ट आहे. ते लोकांना घाबरतात. त्यामुळे कधीही सामना करत नाहीत.

4. 90 वर्षीय व्यक्ती सोबत चालत आहे, तो कुणालाही घाबरत नाही

हा शूरवीरांचा देश आहे. येथे कुणीही घाबरत नाही. हे यात्रेने दाखवून दिले आहे. आम्ही कन्याकुमारीपासून इथपर्यंत आलो आहोत. वेणुगोपाल यांनी मला सांगितले की, राहुल 3000 किलोमीटरपासून एक 90 वर्षांचा व्यक्ती आमच्यासोबत चालत आहे. हा व्यक्ती कुणालाही न घाबरता सर्वांपुढे चालतो. ज्या दिवशी हा देश एकजुटीने उभा होईल, त्या दिवशी द्वेष व हिंसाचाराचे राजकारण संपुष्टात येईल. हा दिवस दूर नाही. तो लवकरच येईल. हा देश पुन्हा एकदा बंधूभावाने उभा राहील.

5. मी हरियाणाच्या रस्त्याने चाललो, येथील लोकांच्या मनात वेदना आहेत

मी हरियाणाच्या रस्त्याने चाललो आहे. क्या झाले आणि काय नाही?, यावर मी बोलणार नाही. भूतकाळात काय झाले त्यात मला रसही नाही. पण मला रस्त्याची दुर्दशा दिसत आहे. लोकांत वेदना आहे. हे सर्वकाही कळते, जेव्हा तुम्ही या रस्त्याने पायी चालता. त्यानंतरही कुठे कमरता आहे हे सांगण्याची गरज पडत नाही. येथे शिक्षणाचीही गरज आहे. येते रुग्णालय-वैद्यकीय महाविद्यालयांची गरज आहे. हे सर्वांसोबत मलाही दिसत आहे. आमचे सरकार आले तर तुम्हाला तुमचा अधिकार दिला जाईल.

जयराम रमेश म्हणाले – रुग्ण जुलै, सप्टेंबर, नोव्हेंबरमध्ये आढळले, PM आज आढावा घेत आहेत

भारत जोडो यात्रा रोखण्याप्रकरणी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी लिहिलेल्या पत्रावर काँग्रेसने जोरदार पलटवार केला आहे. काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश म्हणाले की, जुलै, सप्टेंबर व नोव्हेंबर महिन्यात गुजरात व ओडिशात ओमिक्रॉनचा सब व्हेरिएंट BF.7 चे 4 रुग्ण आढळले. भारत जोडो एका दिवसानंतर दिल्लीत प्रवेश करेल. आता तुम्ही क्रोनोलॉजी समजून घ्या.

काँग्रेसचा आरोप यात्रेमुळे वीज पुरवठा खंडीत

दुसरीकडे, काँग्रेसने हरियाणातील मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वातील भाजप-जजपा सरकारने वीज पुरवठा खंडीत करण्याचा आरोप केला आहे. काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश म्हणाले की, 105 व्या दिवशी भडास नगिनात यात्रा संपली. तेथील ग्रामस्थांनी आज सकाळपासूनच वीज खंडीत झाल्याचे सांगितले. ही सामान्य गोष्ट नाही. काल, परवा किंवा मागील आठवडाभरात वीज पुरवठा खंडीत झाला नाही. भाजपचा डर्टी ट्रिक डिपार्टमेंट हरियाणात जास्त कष्ट करत आहे.