मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी सोहळा विधानभवनाच्या प्रांगणात सुरू झाला असून विधानभवनाच्या प्रांगणातला पहिलाच शपथविधी सोहळा आहे. शपथविधीसाठी शिवसेना आणि भाजपचे सर्व नेते विधानभवन परिसरात दाखल झाले आहेत.काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शपथविधीकडे पाठ फिरवली. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे देखील प्रांगणात उपस्थित आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्याकडून भाजप आणि शिवसेना आमदारांना मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली जात आहे.भाजप नेते राजकुमार बडोले यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेताना आईवडीलांच्या नावाचा उल्लेख सुध्दा केला.शिवसेनेच्या मंत्र्यानी बाळासाहेब ठाकरे यांना स्मरण करुन शपथ घेतली.
* भाजपचे आमदार गिरीश बापट यांना राज्यपालांकडून कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ.
* राज्यपालांकडून भाजप आमदार गिरीश महाजन यांना कॅबिनेट मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
* शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते यांना राज्यपालांकडून कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ.
* शिवसेनेचे आमदार सुभाष देसाई यांना यांना राज्यपालांकडून कॅबिनेट मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ.
* शिवसेना नेते रामदास कदम यांनाही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
* शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना राज्यपालांकडून कॅबिनेट मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ.
* भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनाही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ.
* भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ.
* शिवसेनेचे आमदार डॉ. दीपक सावंत यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
* भाजप नेते राजकुमार बडोले यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
* भाजप नेते राम शिंदे यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
* भाजप नेते विजय देशमुख यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.