कृषीक्षेत्रासाठी 25 हजार कोटींची तरतूद

0
5
मुंबई, दि. १८ – अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कृषीक्षेत्रासाठी  25 हजार कोटींची तरतूद केली असल्याचं सांगत राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली. कृषी क्षेत्राचा विकासदर 8 टक्यांपर्यंत पोहोचला आहे. शेतकरी या अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. 2016 – 17 शेतकरी स्वाभिमान वर्ष म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचंही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. 107 कोटी पिक विम्यासाठी तरतुद केली आहे.प्रत्येक जिल्ह्यात कृषी महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.तसेच गोवसंवर्धन व गोवंश सरक्षंण करण्याचे काम करणार्या संस्थासाठी 1 कोटीची तरतुद केली आहे.
जलयुक्त शिवारसाठी १ हजार कोटींची तरतुद करण्यात आली आहे. स्वातंत्र्यानंतर शेतक-यांना सर्वात भरीव मदत यावर्षी सरकारने केली आहे. शेतक-यांसाठी राज्य आणि केंद्र सरकारची ४ हजार कोटींची तरतुद असून १८८५ कोटी राज्य सरकारने पीक विमासाठी तरतुद केली असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली. जलयुक्त शिवार कार्यक्रमासाठी 1 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पारंपारिक तंटे मिटवण्यासाठी पाणंद रस्ता योजनेची घोषणा यावेळी करण्यात आली.
शेततळी, विहिरी, विद्युत पंप जोडणीसाठी 2 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अल्प व्याजदराने शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.मत्स्यसंवर्धनासाठी 150 कोटींची तरतूद करण्यात आली आहे तर कडधान्य आणि तेलबीयांसाठी 80 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.दोन नव्या पशू महाविद्यालयांसाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली असून कृषीप्रक्रिया उद्योग उभारणा-ला 25 टक्के किंवा 50 लाखांपर्यंत अनुदान देण्यात येणार असल्याचंही मुनगंटीवारांनी सांगितलं.
वीज उपकेंद्रासाठी 1500 कोटीची तरतुद करीत विदर्भ व मराठवाड्यातील उद्योगांना कमी दरात वीज देण्याची घोषणा केली.मुख्यमंत्री ग्रामसडक योजेनेसाठी 1000 कोटीची तरतुद करण्यात आली आहे.