अमृता फडणवीस यांची रियाझ अलीसोबत रील:’मूड बना लिया’ गाण्याच्या हूक स्टेपवर अलीने धरला ठेका

0
11

मुंबई-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं अज मैं मूड बना लिया हे गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. रिलीज झाल्यानंतर हे गाणं यूट्यूब आणि सोशल मीडियावर खूप लोकप्रिय ठरत आहे. या गाण्याच्या हूकस्टेपवरच्या रीलही चांगल्याच व्हायरल होत आहे.

अमृता फडणवीस यांनी या गाण्याच्या हूकस्टेपवर रील बनवण्याचे चॅलेंज यूझर्सना दिले होते. आता त्यांनी सोशल मीडिया स्टार रियाझ अलीसोबतही या गाण्याच्या हूकस्टेपवर रील बनवली आहे. या रीलचा व्हिडिओ अमृता फडणवीस यांनी इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे.

12 दिवसांत 4.6 कोटी व्ह्यूज

मूड बना लिया हे गाणं यूट्युबवर चांगलंच लोकप्रिय ठरलं आहे. या गाण्याला आतापर्यंत 4.6 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. तर 1 लाख 27 हजार जणांनी हे गाणे लाईक केले आहे. केवळ 12 दिवसांतच या गाण्याने साडेचार कोटी व्ह्यूजचा पल्ला गाठला आहे.

अमृता फडणवीस या गायनासह सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. सोशल मीडियावरून त्या सातत्याने अपडेट शेअर करत असतात.

या बातम्याही वाचा…

‘आज मैंने मूड बना लिया है…’:अमृता फडणवीसांचे नवीन गाणे रिलीज, पंजाबी साँग तुम्हालाही लावेल वेड

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस नवीन वर्षात त्यांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आल्या आहेत. यंदा त्या पंजाबी मूडमध्ये दिसत आहेत. अमृता फडणवीसांच्या या नव्या गाण्याचे बोल ‘आज मैं मूड बना लिया’ असे आहेत. या गाण्याचा व्हिडिओ आज रिलीज करण्यात आला आहे. बॅचलर्सवर हे गाणे आधारित आहे. नवीन गाण्यात अमृता गाण्याबरोबरच डान्सही करताना दिसत आहेत. (वाचा पूर्ण बातमी)

देवेंद्रजींना गाणे आवडले, पण ते ट्रोलिंगला घाबरले:अमृता फडणवीस म्हणाल्या – उर्फीलाही माझ्या गाण्यावर नाचवा; गाणे गाजेल हा विश्वास

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे मूड बनालेया हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. हे गाणे प्रत्येक लग्नात वाजवले जाईल असा विश्वास अमृता फडणवीस यांनी गाण्याच्या लॉन्च सोहळ्यादरम्यान बोलताना व्यक्त केला.

मूड बनालेया या गाण्याचा लॉन्च सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात पत्रकारांशी बोलताना अमृता फडणवीस यांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. हे गाणे प्रत्येक लग्नात वाजेल असा विश्वास आपल्याला असल्याचे अमृता फडणवीस यावेळी म्हणाल्या