RBIने बँकांना विचारले – अदानी ग्रुपला किती कर्ज दिले:संसदेत गदारोळ; विरोधकांची चौकशीची मागणी

0
51

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)-  RBIने अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड (AEL) ला दिलेल्या कर्जाबाबत सर्व बँकांकडून माहिती मागवली आहे. हे वृत्त देणाऱ्या रॉयटर्स या वृत्तसंस्थेने सांगितले की, RBIच्या अधिकाऱ्यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला. मात्र, नावे न घेता ही माहिती देण्यात आली आहे. पूर्णपणे सबस्क्राइब्ड झालेला FPO रद्द केल्यानंतर गुरुवारी समूहाचे शेअर्स 10% पर्यंत घसरताना दिसत आहेत.

दुसरीकडे, या प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ झाला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. बुधवारी रात्री उशिरा अदानी समूहाने 20 हजार कोटी रुपयांचा पूर्ण सबस्क्राइब झालेला FPO रद्द केला होता. गुंतवणूकदारांचे पैसे परत केले जातील, असे कंपनीने सांगितले होते. याआधी बुधवारी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 26.70% घसरून 2179.75 वर बंद झाले. यामुळेच अदानी समूहाने FPO मागे घेण्याचा निर्णय घेतला. अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडने बुधवारी रात्री उशीरा 20 हजार कोटींचा पूर्णपणे सबस्क्राईब्ड एफपीओ रद्द केला आहे. गुंतवणुकदारांचा पैसा परत केला जाईल. या इक्विटी शेअर्सची फेस व्हॅल्यू एक रुपया आहे.

अदानी स्वत: समोर आले, गुंतवणूकदारांना दिला व्हिडिओ संदेश

गौतम अदानींनी एफपीओ रद्द केल्यानंतर एक व्हिडिओ संदेश दिला. यात गुंतवणुकदारांचे आभार मानले. म्हटले, ‘गेल्या आठवड्यात स्कॉटकमध्ये झालेल्या चढ-उतारानंतरही कंपनीचा व्यवसाय आणि त्याच्या व्यवस्थापनातील आमच्याविषयीचा विश्वास आश्वासक आहे. माझ्यासाठी गुंतवणुकदारांचे हित सर्वोपरी आहे. बाकी सर्व दुय्यम आहे. म्हणून गुंतवणुकदारांना संभाव्य नुकसानीपासून वाचवण्यासाठी आम्ही एफपीओ मागे घेतला आहे.’

ते म्हणाले, ‘या निर्णयाचा आमचे विद्यमान ऑपरेशन्स आणि भविष्याच्या योजनांवर कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही योजनांच्या कालबद्ध परिचालनाकडे लक्ष देऊ. बोर्डाला वाटले की एफपीओसह पुढे जाणे नैतिकदृष्ट्या योग्य ठरणार नाही. बाजारात स्थिरता आल्यावर आम्ही आमच्या भांडवली बाजार धोरणाचा आढावा घेऊ. आमचे ईएसजीवर विशेष लक्ष आहे. आमचा प्रत्येक व्यवसाय जबाबदारीने मूल्य निर्माण करत राहील.’

13 विरोधी पक्षांची मागणी- हिंडेनबर्ग अहवालावर संसदेत चर्चा व्हावी

काँग्रेस, टीएमसी, आम आदमी पार्टी, सपा, द्रमुक, जनता दल आणि डाव्यांसह तेरा विरोधी पक्षांनी अदानी समूहावरील हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्टमधून झालेल्या आरोपांवर बैठक घेतली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात ही बैठक झाली. यापैकी 9 पक्षांनी राज्यसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली.

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, लोकांच्या कष्टाचा पैसा वाया जात आहे. लोकांचा बँक आणि एलआयसीवरील विश्वास उडेल. काही कंपन्यांचे शेअर्स सातत्याने घसरत आहेत. आर्थिक दृष्टिकोनातून देशात घडणाऱ्या घटनांवर सभागृहात आवाज उठवायचा आहे, असा निर्णय सर्व पक्षांच्या नेत्यांनी मिळून घेतला आहे, म्हणून आम्ही नोटीस दिली होती. आम्हाला या नोटीसवर चर्चा हवी होती, पण आम्ही जेव्हा जेव्हा नोटीस देतो, तेव्हा ती फेटाळली जाते.

अदानी एंटरप्रायझेसने बुधवारी प्रेस रिलीज जारी केली. ती खाली पाहा…

‘अदानी एंटरप्रायझेसने 1 फेब्रुवारीला झालेल्या बोर्डाच्या बैठकीत निर्णय घेतला की, आम्ही एफपीओ पुढे घेऊन जाणार नाही. आम्ही परिस्थिती आणि स्टॉकमधील चढ-उतार पाहता हा निर्णय घेतला आहे की ग्राहकांच्या हितासाठी एफपीओसह पुढे जाणार नाही आणि व्यवहार पूर्णपणे मागे घेतले जातील. आम्ही गुंतवणुकदारांचे एफपीओत सहभागी होण्यासाठी आभार मानतो. या एफपीओचे सबस्क्रिप्शन काल यशस्वीरित्या बंद झाले आहे.’

स्टॉक अस्थिर असूनही ही कंपनी, आमचा व्यवसाय आणि आमच्या व्यवस्थापनावरील विश्वासाबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. तथापि, आज बाजार अभूतपूर्व राहिला. आमच्या स्टॉकमध्ये दिवसभर चढ-उतार राहिला. अशी असामान्य स्थिती पाहता कंपनीच्या बोर्डाला वाटले की आता या एफपीओसह पुढे जाणे नैतिकतेच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही. आमच्या गुंतवणुकदारांचे हित सर्वात पुढे आहे.

म्हणूनच भविष्यात होणाऱ्या कोणत्याही आर्थिक नुकसानीपासून त्यांना वाचवण्यासाठी बोर्डाने निश्चित केले आहे की या एफपीओसह पुढे जाणार नाही. आम्ही आमच्या लोकांना रिफंड देण्यासाठी आमच्या बूक रनिंग लीड मॅनेजर्ससह काम करत आहोत. आमचा ताळेबंद मजबूत आहे. आमचा कॅश फ्लो आणि संपत्ती सुरक्षित आहे. सोबतच कर्ज फेडण्याचा आमचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे.

आमच्यासा या निर्णयाने आमचे सध्याचे परिचालन आणि भविष्यातील आमच्या योजनांवर कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही दीर्घ कालावधीत मूल्य निर्मितीवर लक्ष केंद्रित करत राहू आणि आमचा विकास अंतर्गत वाढीच्या हिशोबाने व्यवस्थापित केली जाईल. बाजार जसा स्थिर होईल तसे आम्ही आमच्या भांडवली बाजार धोरणाचा आढावा घेऊ. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्हाला तुमचे सहकार्य मिळत राहील. आमच्यावर विश्वास ठेवण्यासाठी धन्यवाद.’

एफपीओ काय असतो

एफपीओ म्हणजेच फॉलो ऑन पब्लिक ऑफरिंग. ही कंपनीसाठी पैसा उभारण्याची एक पद्धत असते. जी कंपनी आधीच शेअर बाजारात लिस्टेड असते. ती गुंतवणूकदारांसाठी नवे शेअर ऑफर करते. हे बाजारातील शेअरपेक्षा वेगळे असतात. बहुतांश शेअर्स प्रमोटर्स जारी करतात. एफपीओचा वापर कंपनीच्या इक्विटी बेसमध्ये बदल करण्यासाठी असतो.

आयपीओ आणि एफपीओतील फरक काय?

कंपन्या आपल्या विस्तारासाठी आयपीओ आणि एफपीओचा वापर करतात. इनिशिअल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच आयपीओच्या माध्यमातून कंपनी पहिल्यांदा शेअर बाजारात उतरवते. तर एफपीओमध्ये अतिरिक्त शेअर्स बाजारात आणले जातात.