31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home Top News बीबीसीला डॉक्युमेंटरी भोवली?देशभरातील कार्यालयावर का झाली छापेमारी?

बीबीसीला डॉक्युमेंटरी भोवली?देशभरातील कार्यालयावर का झाली छापेमारी?

0
26

नवी दिल्ली – BBC या वृत्तसंस्थेच्या देशभरातील कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. आयकर विभागाचे ६० ते ७० अधिकारी बीबीसी दिल्ली येथील कार्यालयात पोहोचले असून त्यांनी कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांचे फोन जप्त केले असल्याची माहिती आहे. तर कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर जाण्यासही मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या देशभरात भाजपवर टीका केली जात आहे.

दरम्यान,बीबीसीला (BBC)ने ‘India The Modi Question’ हा माहितीपट प्रदर्शित केला होता. गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या गोधरा हत्याकांडावर ही डॉक्युमेंटरी होती. प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतच केंद्र सरकारकडून या डॉक्युमेंटरीवर बंदी घालण्यात आली होती. BBC कडून नरेंद्र मोदी यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजपकडून केला गेला.

blank