अमरावतीचे प्रथम महापौर देवीसिंग शेखावत यांचे निधन

0
26

अमरावती,दि.24ः अमरावतीचे प्रथम महापौर, माजी आमदार तथा देशाच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती, माजी आमदार रावसाहेब शेखावत यांचे वडील देवीसिंग शेखावत यांचे आज पुणे येथे निधन झाले.

दोन दिवसांपूर्वी, हृदयविकाराचा धक्का आल्याने देवीसिंह शेखावत यांना पुण्यात केईएम हॉस्पिटलला दाखल केले होते. आज सकाळी 9.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आज सायंकाळी 6 वाजता त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.