छत्रपतींच्या विचारांचा महाराष्ट्र घडविण्यास सज्ज व्हा !..व्याख्याता अश्विनी भिवगडे

0
15
  • *▪️विविध जाती धर्माच्या व्यक्तींनी केली शिवजयंती साजरी*

सालेकसा दि.२४::–बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं.
बुद्धिवंत, किर्तीवंत, ज्ञानवंत, अशा छत्रपती शिवाजी महाराजांना आपले सर्वस्व मानणारे अनुयायी आज छत्रपतींना आणि संत , महापुरुषांना जातींमध्ये वाटण्याचा प्रयत्न करीत आहे. ही स्थिती प्रत्येक समाजामध्ये पाहताना दिसत आहे हे सर्व बंद झालं पाहिजे. खरं तर छत्रपतींना डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांच्या विचारांना डोक्यात घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तेव्हाच छत्रपतींच्या विचारांचा महाराष्ट्र उभ राहणार आहे. म्हणुन छत्रपतींच्या विचारांचा महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने ताठमाणाने सज्ज होणे अत्यंत गरजेचे आहे. असे वक्तव्य व्याख्यात्या अश्विनी भिवगडे यांनी केले. त्या यावेळी सामुदायिक जयंती उत्सव समिती सालेकसा द्वारा अयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सव कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक स्थानावरून बोलत होत्या .
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा ज्योतिराव फुले , डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांची पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अजय उमाटे , ब्रजभुषणसिंह बैस, खेमराज साखरे, मूलचंद गावराने, गुणवंत बिसेन, राजेंद्र बडोले, पिंकी पांडे, अर्चना मडावी, वंदना मेश्राम, कैलाश गजभिये, राजु जैन, मनोज शरणागत, मधुकर हरिणखेडे, युवा कवी पवन पाथोडे, तमिल टेंभरे, राजेंद्र भसमोटे, विनोद वैदय, दिवाकर सोनवाने, सुनिल बनसोड, रमेश करवाडे, मुरलीधर कावळे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते‌. कार्यक्रमाची भूमिका, सामुदायिक जयंती उत्सव समितीचे उद्देश्य यावर प्रास्ताविकेतून सविस्तर मार्गदर्शन राहुल हटवार यांनी केले . कार्यक्रमाचा विशेष म्हणजे सामुदायिक जयंती उत्सव समितीच्या वतीने सर्व जाती, धर्म एकत्रित येऊन सामूहिक रित्या शिवाजी महाराजांची जयंती करण्याचा हा नव्याने सुरुवात करण्यात आला असून एक नाविन्यपूर्ण उपक्रम असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. शिवाजी महाराजांचीच नाही तर प्रत्येक महापुरुषांची जयंती या समितीच्या वतीने साजरी करण्यात येणार असल्याचा उद्देशीय समितीच्या वतीने मांडण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे संचालन निर्दोष साखरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार ब्रजभुषण बैस यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहित बनोठे, मायकल मेश्राम, निखिल मेश्राम, सोपनिल करवाडे , भौतिक हरीणखेडे , सूर्या उपराडे, अक्षय कुरपाले , आनंद सेऊतकर, रघु सेऊतकर, विशाल चंद्रीकापुरे, अंजली हटवार, साक्षी मेश्राम यांनी विशेष परिश्रम घेतले.

▪️कोरोना काळात सेवा देणाऱ्यांच्या विशेष सत्कार*

संपूर्ण देशात कोरोना महामारीने थैमान घातलेला होता आणि जग थांबलेलं होतं मात्र अशा परिस्थितीत काही लोकांनी आपल्या जीवाची परवा न करता माणुसकी जपत योगदान दिले त्यात तालुक्यातील नगरपंचायत सालेकसा येथील सर्व सफाई कामगार, अग्निशमन विभाग नगरपंचायत सालेकसा कर्मचारी, आरोग्य सेवेतील कर्मचारी, डॉ. शक्ती सोनी, डॉ. शैलेष भसे, डॉ. विकास डोये, डॉ. रिव्यानी मेश्राम, डॉ. अंजली पांडे, आशा पटले,सचिन जगनीत, मुकेश ढेकवार, धीरज शिवणकर, चांगेश्वर उईके, युवराज उईके, जीवतराम मोटघरे तसेच जेष्ठ नागरिक यांचा विशेष सत्कार करण्यात आला.