सरकारी योजना आणि योजनांप्रती समाजात अनस्थेची पेरणी- कविता थोरात

0
15
कल्याणकारी राज्याच्या उभारणीतील शासकीय योजनांबाबत सर्वसांमान्य लोकामध्ये अनादराची भावना जाणीव पूर्वक कशी पसरवली जाते ते बघा..
या संवादातून लक्ष्यात येईल.
एका सरकारी अस्थापनेतील समितीची आढावा बैठक होती. समिती सदस्य असल्याकारणाने बैठकीस उपस्थित होते. बैठकीचे सर्व मुद्दे संपल्यावर चहा पान करताना एक समिती सदस्य फार ज्ञान असल्यासारखी अडानीच्या शेअर्सची घसरण, बेरोजगारी, महागाई यावर एखादा मिनिट बोलल्ली. खर तर तो संवाद तिनेच सुरू केला होता.
नंतर अचानक तीने तिच्या घरातल्या कामवाल्या बाई बद्दल बोलायला सुरुवात केली.
कामवाल्या बाईच्या कुटुंबाने कसे झोपडपट्टीतल्या घरावर अतिक्रमण केले आहे आणि आता कसं छान टुमदार घर बांधले आहे. राशनचे पाच किलो तांदूळ आणि इतर निकृष्ट दर्जाचे सामान ती कशी आजूबाजूच्या परिसरातील कुटुंबांना विकते याचे रस भरीत वर्णन ती तोंडाला फेस आणुन सांगत होती. हे लोक कसे फुकट जगत आहेत आणि सरकारला ताण देत आहेत, असा एकूण सुर ती आळवत होती.
हे लोकं बँकांकडून लोन घेऊन ते फेडत नाहीत म्हणाली.
इतका दांडगा द्वेषपूर्ण अभ्यास शासकीय योजनांबाबत तिने केला होता. इतर कोणालाही तिचे संभाषण ऐकण्यात काडीचा रस नाही असे तिला जाणवू लागल्याने आणि ते नाटकी, उगाच आळ घेणारे भाव त्या वक्तव्यात जाणवत असल्याने कोणीही आय कॉन्टॅक्ट ही देत नव्हते. मीटिंग आधीच संपलेली होती, एव्हाना कपांमधला चहा ही संपत आला असल्याने लोकांनी आपापली पर्स डायरी उचलून निघून गेले.
बाईचे केस बारीक कापलेले स्लिव्हलेस ब्लाउज आणि रेशमी साडी आंगावर घातलेली होती. पार्लर मध्ये जाऊन जाऊन तिची त्वचा तुकतुक्तीत होऊन चकाकत होती. भलताच फाजील आत्मविश्वास वागण्या बोलण्यातून ओसंडून वाहत होता.
भाबडे कष्टकरी लोक यांच्या घरात कामं करतात त्यांचा आदर सन्मान करतात, आणि हे लोकं काय भावना बाळगतात या कष्टकऱ्याबाबत ! त्यांचे झोपडपट्टीतले टुमदार घर करोडोच्या बंगलेवाल्यांच्या डोळ्यात का बरं खुपत असावे, त्याचा मोतीबिंदू व्हावा नजरेवर पडदा पडावा इतपत ते भिनावे!
अश्या लोकांकडे कोणीही घरकाम करण्यास जाऊ नये. बाकी कोणतही काम करावे पण अश्या लोकांपासून दूर असावे अस मला प्रकर्षाने जाणवत राहिलं.
सर्व लोकं त्या रूम मधून बाहेर पडले. पण माझ्या डोक्यात त्या संवादाचा भुंगा चावा घेऊ लागला.
त्यासाठी मोकळ होन गरजेचं होतं.
हा संवाद अनावश्यक तर होताच शिवाय लोकांना बुचकळ्यात टाकणारा होता. खरे खोटे काय आहे? किती आहे? हे कोणी तपासायला जाणार नाही हे माहीत असल्यामुळे असे बेजबाबदार वक्तव्य ही लोकं करतात.
अधून मधून लिहिलेल्या डायरीच्या पानांमधून!!