Breking! सोनिया गांधी राजकारणातून निवृत्ती घेणार?

0
14

रायपूर | काँग्रेसचे  85 वे महाअधिवेशन सध्या छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे सुरु आहे. देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी या अधिवेशनात उपस्थित आहेत. यावेळी बोलताना काँग्रेस खासदार सोनिया गांधी यांनी मोठी घोषणा करीत त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत.

आजपर्यंत भारतात काँग्रेसने लोकशाही मजबूत केली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतून लोकशाहीची मूल्ये जपण्यास मदत झाली. मात्र भारत जोडो यात्रा हाच माझ्या राजकीय जीवनातील अखेरचा टप्पा असू शकतो, असे वक्तव्य सोनिया गांधी यांनी केले आहे.भारत जोडो यात्रेसाठी त्यांनी राहुल गांधींचे आभार मानले. काँग्रेस हा केवळ राजकीय पक्ष नसून देशाच्या एकात्मतेची धुरा आहे, असे माजी काँग्रेस अध्यक्षा म्हणाल्या.

आपण देशाच्या प्रश्नांसाठी लढतोय. आता आपण जनतेचा आवाज होण्याची वेळ आली आहे. धर्म, जात, भाषेची पर्वा न करता आपल्या सर्वांचा आवाज बना. त्यामुळे आपला विजय निश्चित होईल. राहुल यांच्या समर्पण आणि निष्ठेमुळे भारत जोडो यात्रा यशस्वी झाली. त्यांच्या यशाचे श्रेयही यात्रेत सहभागी असलेल्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना जाते.

सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात भाजपवर निशाणा साधला. दलित, अल्पसंख्याक, आदिवासी आणि महिलांवर अत्याचार होत आहेत. प्रत्येक संस्थेचा गैरवापर होत आहे. संविधानाच्या मूल्यांना धक्का पोहोचला आहे. पुढे आणखी कठीण काळ असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.