गोंदिया,दि.18 मार्चः-जिल्हा मुख्यालयापासून 10 किमीवर असलेल्या बिरसी विमानतळावरुन इंदिरा गांधी राष्ट्रीय उड़ान अकादमी (इग्रुआ) रायबरेली केंद्रातील एका प्रशिक्षणार्थी क्रॉफ्टने प्रशिक्षकासह प्रशिक्षणार्थी घेवून दुपारच्या सुमारास उड्डाण भरली. दरम्यान क्रॉफ्टमध्ये बिघाड आल्याने दुपारी तीन वाजताच्या सुमारास क्रॉफ्टमध्ये बिघाड आल्याने मध्यप्रदेशातील किरणापूर जंगलातील भक्कुटोला जंगलात कोसळले. यात प्रशिक्षासह प्रशिक्षणार्थिचा देखील मृत्यू झाला. ही घटना आज, शनिवारी घडली. ही घटना एवढी मोठी होती विमान पहाडावर कोसळल्यानंतर विमानाला आग लागून तुकड़े तुकडे झाले असून चाके सुद्दा तुटल्याचे बघावयास मिळत आहे.यामध्ये पुरुष प्रशिक्षणार्थी मात्र जळाल्याने घटनास्थळावरच मृत्यू झाला.मात्र महिला प्रशिक्षणार्थीबद्दल अधिकृत माहिती मिळालेली नाही. बिरसी येथील वैमानिक प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षक वैमानिकाचे नाव कॅप्टन मोहित ठाकूर असे आहे.तर महिला प्रशिक्षणार्थिनीचे नाव कु.रुपशंका असे आहे.
बिरसी विमानतळावर रायबरेली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय उड़ान अकादमी (इग्रुआ) वैमानिक आपल्या वरिष्ट पायलटसोबत प्रशिक्षणार्थी विमानाने विमानतळावरुन उड्डाण घेतल्यानंतर गोंदियापासून उत्तरेला असलेल्या भक्कुटोलाच्या जंगलातील पहाडीभागात प्रशिक्षणार्थी वैमानिकाचे नियंत्रण सुटून पहाडावर आदळून कोसळल्याची माहिती बिरसी विमानतळ प्राधिकरणाचे प्रबधंक शफिक शहा यांनी बेरार टाईम्सला दिली. बिरसी विमानतळ सर्व सुविधायुक्त आहे. येथे वैमानिक प्रशिक्षण केंद्र देखील आहे. वैमानिक प्रशिक्षण केंद्रावर केंद्र शासनाच्या इग्रो या उत्तरप्रदेशातील वैमानिक प्रशिक्षण केंद्र आणि एका खासगी प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षणार्थी वैमानिकाचे प्रशिक्षण घेतात. आज, शनिवारी (ता.18) इग्रो संस्थेचे व्हीटीएफजीएलडीए-40 क्रमांकाच्या एअर क्रॉफ्टने बिरसी विमानतळावरून दुपारच्या सुमारास उड्डाण भरली. या क्रॉफ्टमध्ये प्रशिक्षक मोहित ठाकूर आणि एक महिला प्रशिक्षणार्थी वृक्षंका होते. मध्यप्रदेशातील नक्षलबहूल असलेल्या किरणापूर नजीकच्या भक्कुटोला परिसरात विमान जंगलातील डोंगराळ भागात कोसळले.
किरणापूर पोलीस ठाणे अंतर्गतच्या भक्कूटोलाच्या जंगलातील पहाडावर विमान कोसळल्याचे लक्षात येताच गावपरिसरातील आजुबाजूच्या नागरिकांनी धाव घेत पोलिसांना माहिती दिली.हे विमान ४ आसनी होते.घटनेची माहिती मिळताच मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (नक्सल) आदित्य मिश्रा यांनी घटनास्थळाकड़े धाव घेत घटना घडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अपघातात पुर्णत मोडकळील आलेल्या प्रशिक्षणार्थी विमानाच्या ब्ॅलकबाँक्स च्या तपासणीनंतरच विमानात बिघाड आला होता की नाही याचा उलगडा होणार आहे.
यापूर्वी देखील बिरसी विमानतळावरील प्रशिक्षण देणाऱ्या क्रॉफ्टमध्ये बिघाड होवून मध्यप्रदेशातील पचमढी व खैरलांजी येथे कोसळले होते. त्यात पायलट आणि महिला प्रशिक्षणार्थिचा मृत्यू झाला होता.तसेच गोंदिया तालुक्यातील देवरी जवळील वैनगंगा नदीपात्रातही क्राप्टकोसळून दोन प्रशिक्षणार्थी ठाऱ झाले होते.