41.3 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोन डॉक्टरसह तिघे ठार

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोन डॉक्टरसह तिघे ठार

0
47

blank

वर्धा : समृद्धी महामार्गावर जिल्ह्यातील सर्वात भीषण अपघात घडला आहे. सेलू लगत कोटांबा फाटा येथे सोळा चाकी ट्रक क्र. एम.एच. ४० बी.एल. ८२३५ ला अल्टो एम.एच. ३७ जी ३५५८ या कारची धडक बसली. रात्री हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते.अपघातात वाशिम येथील कारचालक डॉ. ज्योती भरत क्षीरसागर व त्यांची मैत्रिण डॉ. फाल्गुनी सुरवाडे रा.अमरावती, तसेच वडील भरत दत्तात्रय क्षीरसागर रा.वाशिम हे तिघेही ठार झाले.

समृद्धी महामार्गावर नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला भरधाव कारने मागून धडक दिली. यात कारमधील दोन डॉक्टर मैत्रिणीसह एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. नागपूरला कामानिमित्त रात्री समृद्धी महामार्गाने जात असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

घटनेचा पंचनामा

घटनेची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिस चौकीतील पोलिस उपनिरिक्षक दिलीप थाटे घटनास्थळी पोहोचत त्यांनी वाहतूक सुरळीत केली. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत सेलू पोलिसांना माहिती दिली. तीनही मृतदेह सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

blank

समृद्धी मार्गावर अपघात : तिन गंभीर जखमी

पुणे येथून नागपूर कडे समृद्धी मार्गाने जात असताना मालेगाव जवळ कार चालकाचे स्टिअरिंग वरील नियंत्रण सुटल्याने सुसाट वेगात असलेली कार खड्यात जाऊन पलटी झाली. ही घटना १ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता समृद्धी एक्स्प्रेस वें वरील मालेगाव ते शेलुबाजार दरम्यान घडली. या अपघातात कार मधील तिघेही प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांचेवर वाशिम येथील एका खासगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.

blank