मुंबई -वागधारा सन्मान सोहळा 2023 चे आयोजन नुकतेच अंधेरी येथील ‘मुक्ती सभागृहात’ करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यासाठी केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान हे प्रमुख पाहुणे होते तर शर्मिला राज ठाकरे आणि कृपाशंकर सिंह यांच्या उपस्थिती लाभली होती.
वागधाराचे अध्यक्ष डॉ.वागीश सारस्वत यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या सोहळ्यासाठी माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष होते. साहित्य, सांस्कृतिक, शिक्षण, कला, समाजसेवा, वैद्यक, पत्रकारिता, संगीत, चित्रपट, टीव्ही आणि नाट्यक्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या देशभरातील महान व्यक्तींचा गौरव.या सोहळ्यात करण्यात येतो. सामाजिक क्षेत्रात अभिनव कामगिरी करून आपला ठसा उताविणाऱ्या ‘नूतन गुळगुळे’ यांना यंदा सामाजिक पुरस्कारासाठी सन्मानित आले. लवकरच त्यांच्या ‘स्वानंद सेवा सदन’ या कोरोनामुळे पालक गमावलेल्या ‘दिव्यांग’ बालक आणि त्यांच्या एकल पालकांसाठी सुरु होणाऱ्या भारतातील पहिल्या दिव्यांग वसतिगृह आणि प्रशिक्षण केंद्राच्या उभारणी कार्यासाठी मदत करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले.
यासोबतच पत्रकार विजय सिंग कौशिक, राजकुमार सिंग, आदित्य दुबे, अनिल तिवारी आणि ओमप्रकाश तिवारी, इरबाज अन्सारी, शरद राय, शिवपूजन पांडे यांना वागधारा स्वयंसिद्ध सन्मान प्रदान करण्यात आला. ‘वागधारा’ २०२३ पुरस्कार समितीचे अध्यक्ष जयंत देशमुख यांच्यासह संपादक नरेंद्र कोठेकर, चेतना पाठक, विमल मिश्रा यांनी पुरस्कार्थींची निवड केली.