…तर महिला रस्त्यावर उतरल्याच पाहिजेत;केसेसची चिंता करू नका,सरकार आल्यावर काढू शरद पवार

0
7

मुंबई:-मुंबईत आज पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी देशातील महिलांच्या भीषण परिस्थितीवर भाष्य केलं. मणिपूरच्या घटनेचा उल्लेख करत या सगळ्या प्रश्नांच्याबद्दल अतिशय जागरुक राहण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल, तसंच अशा घटना ज्या ठिकाणी होत असतील तर त्या ठिकाणच्या स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगिनी रस्त्यावर उतरल्याच पाहिजे, असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडलं आहे.

शरद पवार यांनी बोलताना महिला धोरण, आरक्षण याचा उल्लेख केला. हे निर्णय आपण मिळून घेतला असं ते म्हणाले. मालमत्तेत अधिकाराचा निर्णय आपण घेतला होता, त्याची अंमलबजावणी हवी तशी झाली असं वाटत नाही. तेव्हा हे कार्यक्रम हाती घ्यावे लागतील. सरकारच्याकडे अर्ज करावा लागेल, असं त्यांनी सांगितलं. संरक्षण खात्यात आपण निर्णय घेतले. तिन्ही विभागांचा त्याला विरोध होता. पण संरक्षण खातं माझ्याकडे होतं. मी मंत्री म्हणून महिलांना याठिकाणी संधी देण्याचा निर्णय घेतला. यासगळ्या जमेच्या बाजू असल्याचं ते म्हणाले.

दुसऱ्या बाजूला आज आपण पाहतो मणिपूर सारखं उदाहरण. त्या ठिकाणी महिल्यांवर हल्ले केले जातात, धिंड काढली जाते, जिवंत जाळले जातात. तसंच अशा घटना ज्या ठिकाणी होत असतील तर त्या ठिकाणच्या स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगिनी रस्त्यावर उतरल्याच पाहिजे, असं स्पष्ट मत शरद पवार यांनी मांडलं आहे.

काही होऊ दे, एखादा खटला दाखल करतील, एखादा कलम लावतील. यावेळी लोकांच्या प्रश्नासाठी केसेस अंगावर घ्यायच्या. त्याची चिंता करायची नाही. आपलं सरकार आल्यानंतर आपण त्या केसेस काढून टाकतो. तेव्हा त्याची चिंता करू नका. पण रास्त प्रश्नासाठी रस्त्यावर येणं हा आमचा हक्क आहे हे समजून भूमिका घेतली पाहिजे , असं शरद पवार यांनी सांगितलं.

शाळ्यांच्या खासगीकरणाविरोधात आवाज!

सरकारनं जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या शाळा या आता खासगी कंपन्यांना दत्तक देण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी कंपनीला शाळा आणि त्यांनी सीएसआर फंडातून शाळा चालवावी त्यातून विकास करावा. आता ज्या कंपनीनं शाळा विकत घेतली त्या शाळेला कोणतंही नाव द्यायचा अधिकार असेल. भविष्यात या कंपनीला हस्तक्षेपाचे अधिकार, शाळेच्या संपतीचा उपयोग हा वैयक्तिक कारणासाठीही होऊ शकेल. एक उदाहरण नाशिक जिल्ह्यात एक शाळा मद्य तयार करणाऱ्या कंपनीनं दत्तक घेतली. त्या शाळेत गौतमी पाटील यांच्या नृत्याचा कार्यक्रम घेतला. ही शाळा, हा आदर्श मुलांच्या समोर ठेवत आहे. म्हणून शाळा खासगी कंपन्याना दत्तक घेण्याच्या निर्णयाला विरोध केला पाहिजे.