राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी दिला पत्राद्वारे राजीनामा

0
14

राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य बालाजी किल्लारीकर यांनी राजीनामा दिल्यानंतर आता सदस्य लक्ष्मण हाके यांनी पत्राद्वारे राजीनामा दिला आहे.

पुणे : राज्यात आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे.मनोज जरांगे यांनी 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिल्यानंतर आरक्षण देण्यासाठी विविध पातळ्यांवर काम सुरु केले आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाकडूनही मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी कामकाज सुरु आहे. मात्र आयोगातील मतभेद उघड झाले आहे. आयोगाचे सदस्य बालाजी किल्लारीकर यांनी राजीनामा दिल्यानंतर आता सदस्य लक्ष्मण हाके यांनी पत्राद्वारे राजीनामा दिला आहे.

सर्व समाजाच्या मागासलेपणाचे सर्व्हेक्षण करावे अशी मागणी किल्लारीकर यांनी केली होती. पण, याबाबत एकवाक्यता न झाल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आता हाके यांनी सुद्धा राजीनामा दिला आहे. मागासवर्ग आयोगातील इतर काही सदस्यांमध्ये देखील अस्वस्थता असल्याचे सांगण्यात येते.

लक्ष्मण हाके यांनी पत्रात काय म्हटलं ?

मी लक्ष्मण सोपान हाके, सदस्य महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग या पदावर जून 2023 पासून कार्यरत असून, दिनांक 9/12/2023 रोजी झालेल्या बैठकीत माझ्या व आयोगाच्या वैचारीक मतभेदामुळे व्यथित होऊन माझ्या सदस्य पदाचा राजीनामा देत आहे.