सनफ्लॅग कंपनीत स्फोट, 3 कामगार जखमी

0
10

भंडारा – सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीत आज पहाटे ३.१५ वाजता स्फोट झाला. यात ३ कामगार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नागपूर येथील खासगी रुग्णालयात तात्काळ हलवण्यात आले. या दुर्घटनेत ७ – ८ कामगार किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

सदर घटना कंपनीतील एसएमएस या विभागातील एल एच एफ युनिट मध्ये झाली. घटनेचे मूळ कारण अजून गुलदस्त्यात असून हिटिंग फरनेस मध्ये अचानक मोठा स्फोट झाल्याने तारांबळ उडाली. या भागात कार्यरत ३ कामगार काही प्रमाणात भाजल्या गेले व काही कामगारांना किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
यात टेक्निसीयन नामदेव झंझाड, अभियंता सागर गभने व कंत्राटी कामगार हटवार हे जखमी झाले. त्यांना नागपूर येथे हलवण्यात आले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली.
स्फोट एवढा भयानक होता की कंपनीतील जवळपास असलेले परिसर हादरले होते. या दुर्घटनेत कंपनीतील सामानाचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने प्राणहानी झाली नाही.