अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २१०९ कोटी रुपयांचा निधी मंजुर

0
46

मुंबई, दि. 0१ :– गेल्या वर्षी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी  दोन हजार एकशे नऊ कोटी बारा लाख दोन हजार इतका निधी वितरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेत पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते.  मात्र नोव्हेंबर व डिसेंबर २०२३ मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेत पिकांच्या नुकसानाकरिता सुधारित दराने २ ऐवजी ३ हेक्टरपर्यंत मदत देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात मदतीची घोषणा केली होती.

नोव्हेंबर व डिसेंबर २०२३ या महिन्यात अवेळी पाऊसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानासाठी विभागीय आयुक्त, नागपूर, कोकण, अमरावती, पुणे व छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून मदतीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. या शेतकऱ्यांना मदत व  दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे.  तसेच यापूर्वी १० जानेवारी रोजी नाशिक विभागाकरिता १४४ कोटी निधी वितरणास मान्यता दिली असल्याचेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

नोव्हेंबर व डिसेंबर, 2023 मध्ये शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानाकरिता वितरित करावयाच्या निधीचा तपशिल
अ. क्र. जिल्हा  बाधित क्षेत्र – हेक्टर बाधित शेतकरी संख्या निधी (रु. लक्ष)
1 गोंदिया 12244.12 28242 2054.49
एकूण 12244.12 28242 2054.49
विभागीय आयुक्त, नागपूर यांचा दि.20.01.2024 चा प्रस्ताव
1 नागपूर 13479.93 17936 3268.39
2 वर्धा 8.40 17 1.23
3 भंडारा 8607.93 20821 2318.75
4 गोंदिया 13417.96 25054 3620.88
5 चंद्रपूर 19694.04 39688 2678.38
एकूण 55208.26 103516 11887.63
विभागीय आयुक्त, कोकण यांचा दि.23.01.2024 चा प्रस्ताव
1 ठाणे 157.72 726 33.40
2 पालघर 1677.67 7397 260.05
3 रायगड 1191.23 4560 163.04
4 रत्नागिरी 87.92 365 11.96
5 सिंदूधुर्ग 114.14 635 16.64
एकूण 3228.68 13683.00 485.09
विभागीय आयुक्त, अमरावती यांचा दि.20.01.2024 चा प्रस्ताव
1 अमरावती 206265.86 322944 35795.46
2 अकोला 189681.68 246188 33296.96
3 यवतमाळ 36545.00 84451 6935.25
4 बुलढाणा 157180.90 276575 22034.77
5 वाशिम 60250.95 203857 11526.63
एकूण 649924.39 1134015 109589.07
विभागीय आयुक्त, पुणे यांचा दि.17.1.2024 चा प्रस्ताव
1 पुणे 7863.91 19727 1815.96
2` सातारा 80.63 182 25.64
3 सांगली 16277.89 31549 5811.23
4 सोलापूर 30660.92 41458 8248.17
5 कोल्हापूर 16.18 71 2.33
एकूण 54899.53 92987 15903.33
विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांचा दि.20.1.2024 चा प्रस्ताव
1 छत्रपती संभाजीनगर 148368.41 264194 20600.58
2 जालना 123091.87 207216 19176.93
3 परभणी 95053.67 231787 13080.59
4 हिंगोली 123164.40 257625 16786.65
5 नांदेड 3758.50 3922 880.26
6 बीड 9.90 17 2.19
7 लातूर 262.89 888 35.91
8 धाराशिव 1208.66 1912 429.30
एकूण 494918.30 967561 70992.41
एकूण राज्य