कोसळले MiG 27 विमान

0
8

वृत्तसंस्था
जोधपूर, दि. १३ – देशातील मिग विमान कोसळून दुर्घटनाग्रस्त झाल्याच्या घटना वाढतच आहेत. सोमवारी दुपारी राजस्थानमधील जोधपूर भागात एका MiG 27 विमान कोसळले असून सुदैवाने वैमानिक सुखरुप असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र जोधपूर शहरातील कु़डी भगतसनी भागात हे विमान कोसळल्याने त्या परिसरातील दोन घरे जमीनदोस्त होऊन मोठे नुकसान झाले आहे.
ही दुर्घटना नेमकी कशामुळे झाली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.