देवरी भाजपचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

0
6

देवरी, (ता. 13)-  देवरी नगर पंचायत क्षेत्रात मागील काही वर्षापासून शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून नागरिकांनी घरे बांधली. अशा अतिक्रमित नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नाही. परिणामी, त्यांना शासनाने हक्काचे पट्टे द्यावे, अशी मागणी देवरीचे नगरसेवक यादोराव पंचमवार यांनी शासन दरबारी केली आहे. या आशयाचे निवदेन पंचमवार यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आज देवरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सोपविले.

गेल्या काही वर्षापासून देवरीच्या हद्दीत अतिक्रमित जागेवर बांधकाम करून वास्तव्य करीत असलेल्या नागरिकांना अजूनपर्यंत शासनाने घरांचे अधिकृत पट्टे दिलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. देवरी मधील ८० टक्के घरे अतिक्रमित आहे. परन्तु, या नागरिकांना पट्टे नसल्याने त्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. सुमारे ४०-५० वर्षापासून स्थानिक ग्रामपंचायतीचा घर कर भरत असलेल्या देवरीकरांना त्यांचे हक्क मिळावे म्हणून नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते यादोराव पंचमवार व भाजयुमो तालुका महामंत्री कुलदीप लांजेवार यांनी जनतेची समस्या आज उपविभागीय अधिकारी (राजस्व) यांना निवेदन देत या मूलभूत प्रश्नाला वाचा फोडली. यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री वीरेंद्र अंजनकर,तालुका अध्यक्ष प्रमोद संगीडवार, तालुका महामंत्री तथा नगरसेवक प्रवीण दहिकर,भाजयुमो तालुका अध्यक्ष राजू शाहू, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष इन्द्रजीतसिंग भाटिया,पारस कटकवार,निखिल शर्मा,नगरसेविक संजय उइके, महिला आघाडी अध्यक्ष नूतन सयाम,दिनेश भेलावे,विनोद भेंडारकर,देवराज जगने,कदीर शेख,शिव परिहार,पंकज कावळे,मोरू भेलावे,इमरान खान,प्रितपाल सिंग भाटिया,मोहन गुप्ता,तानबा देशमुख आदी कार्यकर्ते हजर होते.