मानवी जीवन उंचावण्याचे व मानवी मनातील अंधकार दूर करणारे साधन म्हणजे शिक्षण:-इंजि यशवंत गणविर

0
5

अर्जुनी मोर.दिनांक 19-  तालुक्यातील जब्बारखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील नवीन वर्गखोलीचे लोकार्पण जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि. यशवंत गणविर यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की, आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे आणि या युगात टिकून राहण्यासाठी शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे.शिक्षणामुळे आपण सामाजिक, आर्थिक,राजकीय, धार्मिक व सामाजिक क्रांती घडवून आणु शकतो.म्हणुन आपल्या पाल्यांना योग्य अध्यापनासह योग्य मार्गदर्शन करावे.
पुढे बोलताना म्हणाले की,आज आपल्या गावातील सर्व गावकऱ्यांनी मिळुन एक दिवसीय बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केले.आजचे बालक हे उद्याचे भविष्य आहे त्यांच्या अंगी असलेले कला गुण कौशल्य ते आपल्या समोर सादर करत आहे,आपण त्यांचा मनोबल वाढवावा त्यांच्या अंगी असलेल्या कला गुण कौशल्यांना वाव द्यावा जेणेकरून ते उद्याचे सुज्ञ आणि तज्ञ नागरिक बनतील व आपल्या गावाचा क्षेत्राचा नावलौकिक करतील.आपल गाव हे आदिवासी बहुल असुन शेती हा मुख्य व्यवसाय आहे.शेतीची कामे संपली की दुसरे रोजगार उपलब्ध नाही आपल्याला हंगामी रोजगार मिळतात ते वन संपदेवर आधारित जसे मोहफुल व तेंदुपत्ता संकलन.त्यामुळे आपल्याला आपला जीवनमान उंचावण्यासाठी व आपल्या जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी शिक्षण हा महत्त्वाचा घटक म्हणून आपल्या पाल्यांना योग्य शिक्षण व मार्गदर्शन करावे.अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स.सदस्या चंद्रकला ठवरे,पं.स.उपसभापती होमराज पुस्तोडे, सरपंच छायाताई अमले, उपसरपंच जागेश्वर मते, अविनाश रहिले, जितेंद्र कापगते, पोलिस पाटील अमर कोडापे,माजी सरपंच संजय खरवडे, पुरुषोत्तम वलके, सिताराम वलके तथा शाळा समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.