अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातील ६० हून अधिक महिला पोलिसांची प्रकृती बिघडली;रुग्णालयात उपचार सुरू

0
5

अकोला:-अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातील तब्बल ६० हून अधिक महिला पोलिसांना खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. दूषित पाणी प्यायल्यानं ट्रेनिंगवर असलेल्या या पोलीस महिला पोलिसांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यात वाढत्या उन्हामुळे या सर्वांच्या आरोग्यावर परिणाम झाला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांना मळमळ आणि उलट्या होत होत्या.या सर्वां महिला पोलिसांना अकोल्यातल्या एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

सुरुवातीला अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यांना कुठल्याही फरक न जाणवल्याने या सर्वांना खाजगी रुग्णालयात दाखल झाले आहे. जवळपास ६० पेक्षा जास्त महिला पोलिसांवर उपचार सुरू आहे तर काहींना प्रथमोपचार करून परत पाठवण्यात आले आहे. काही मुलींवर गेल्या ३ ते ४ दिवसांपासून उपचार सुरू आहे. दरम्यान दूषित पाणी प्यायल्यामुळे जवळपास २०० पेक्षा जास्त महिला पोलिसांची प्रकृती अचानकपणे बिघडली आहे, असं प्राथमिक कारण समोर येत आहे. तर काहींना उन्हाचा फटका बसला.

दरम्यान काही महिला पोलीस ह्या पश्चिम महाराष्ट्रातील असल्याने त्यांच्या वातावरणात बदल झाला असावा, त्यामुळेच त्यांच्या प्रकृती बिघडली असावी अंदाज लावला जात आहे. दरम्यान यातील एका तरुणीला डेंग्यू, तर ८० टक्के मुलींना कावीळ आजाराची लागण झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरींनी या सर्व आजारी महिला पोलिसांची पाहणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, अशा सुचनाही त्यांनी दिल्या आहे. दूषित पाण्यामुळे हा आजार झाला आहे. तरी याचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र शासनाने करावा, अशी मागणी मिटकरींनी केली आहे.