काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोलेंच्या वाहनाला ट्रकची धडक

0
23

भंडारा,दि.१०-काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे काँग्रेसचे उमेदवार डाॅ.प्रशांत पडोळे यांचा प्रचार दौरा आटोपून रात्री परत येत असताना भिलेवाडा गावाजवळ अनियंत्रित ट्रकने धडक दिल्याचे वृत्त समोर आले आहे.पटोलेंना व त्यांंच्यासोबत असणार्यांना कुठलीही दुखापत झाली नसून भंडारा पोलिसांनी रात्रीलाच घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.