नागझिरा नवेगाव व्याघ्रप्रकल्पात आज पुन्हा एक वाघिण सोडली

0
25

गोंदिया,दि.११ :जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एक वाघिण आज गुरूवारला दुसर्या टप्यात सोडण्यात आली.विशेष म्हणजे नागझिरा नवेगाव व्याघ्रप्रकल्पात ४-५ वाघिण सोडण्याची योजना असून गेल्या वर्षी पहिल्या टप्यात २० मे २०२३ रोजी दोन वाघिणींना वनमंत्राच्या उपस्थित सोडण्यात आले होते.त्या मोहिमेंंतर्गतच आज ११ एप्रिलला दुसर्या टप्यात ताडोबा अंधारी येथे १० एप्रिल २०२४ रोजी जेरबंद करण्यात आलेली वाघिण सोडण्यात आल्याने  पुन्हा एक नवीन पाहुणी व्याघ्र प्रकल्पात आल्याने वन्यप्रेमी मध्ये आनंद व्यक्त केल्या जात आहे. अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) डाॅ.प्रविण चव्हाण यांच्या हस्ते 1 मादा वाघीणीला (NT-3) नवेगाव-नागिझरा व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा कार्यक्षेत्रात सोडण्यात आले. वाघिणींना सोडल्यानंतर सॅटेलाईट जीपीएस कॉलर व व्हीएचएफ (Satellite GPS collar व VHF) च्या मदतीने वाघिणीवर 24 x 7 नियंत्रण ठेवले जाणार आहे.हळूहळू या वाघिणीच्या स्थिरतेनंतर इतर वाघिणींना सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.