छत्तीसगडमध्ये १८ जणांचा मृत्यू; २५ जण जखमी ,पिकअप वाहन खोल खड्ड्यात पडले

0
13

रायपूर,दि.२०(वृत्तसंस्था)- छत्तीसगडमधील कवार्धामध्ये मंगळवारी सकाळी एका भीषण अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला आहे तर २५ जण जखमी झाले आहेत. पिकअप वाहन एका खोल खड्ड्यात पडल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. कवार्धाचे पोलीस अधीक्षक भिषेक पल्लव यांनी सांगितले की, अपघात सकाळी ८ वाजता कवार्धा-कटघोरा रस्त्यावर झाला. पिकअप वाहनात ३० ते ३५ मजूर प्रवास करत होते. वाहन खड्ड्यात पडून पलटून गेले, ज्यामुळे वाहनातील अनेक प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पिकअप वाहनात ३० ते ३५ मजूर प्रवास करत होते. वाहन खड्ड्यात पडून पलटून गेले, ज्यामुळे वाहनातील अनेक प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी मृत्यूचे दुःख व्यक्त केले आणि जखमींच्या लवकर बरे होण्याची कामना केली. स्थानिक प्रशासन पीडित कुटुंबांना मदत करत आहे. पोलिसांनी अपघाताची चौकशी सुरू केली आहे आणि वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.