रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे मुंबई विद्यापीठाच्या उद्याच्या २ परीक्षा पुढे ढकलल्या

0
3

मुंबई : मध्य रेल्वेच्या तांत्रिक कामासाठी दिनांक ३० मे २०२४ मध्यरात्रीपासून विशेष मेगा ब्लॉक घेतला जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास जाताना गैरसोयीचे होऊ शकेल. यामुळे शनिवार दिनांक १ जून २०२४ रोजीच्या होणाऱ्या दोन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

शनिवार दिनांक १ जून रोजी अभियांत्रिकी शाखेची सत्र ८ ची एक व बीएमएस ( ५ वर्षीय एकत्रित अभ्यासक्रम) सत्र २ ची एक अशा दोन परीक्षा होत्या. मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉक मुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.

|| आजच्या परीक्षा ||
आज दिनांक ३१ मे २०२४ रोजी विविध विद्याशाखेच्या एकूण ४३ परीक्षा होत्या. परंतु आजच्या रेल्वेच्या मेगा ब्लॉकचा कोणताही परिणाम आजच्या परीक्षेवर झाला नाही.
१. विज्ञान शाखेच्या ३ परीक्षा
२. अभियांत्रिकी शाखेच्या २७ परीक्षा
३. वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या ८ परीक्षा
४. मानव्य विज्ञान शाखेची १ परीक्षा
५. आंतर विद्याशाखेच्या ४ परीक्षा
* एकूण : ४३ परीक्षा आज संपन्न झाल्या.