सडक अर्जुनी- अर्जुनी तालुक्यातील ग्राम घटेगाव येथील रहिवासी कु आकांक्षा रामटेके हिने दहावी बोर्डाच्या परीक्षेत ९३.६० टक्के गुण प्राप्त करून शाळेतून पहिली आली.तिने मिळविलेल्या यशाबद्दल सौंदड सेवानिवृत्त मुख्याध्यापक अनिल मेश्राम यांनी ग्राम घटेगाव येथे जाऊन आईवडील यांचे आकांशाचा सत्कार केला.सत्कार निमित्त सम्राट अशोक चरीत्र, पेन गुलाबपुष्प आणि पेढे देऊन अभिनंदन केले.सोबत सेवानिवृत्त नायब तहसीलदार भाऊराव यावलकर सौंदड हे होते.
आकांक्षा रामटेके हिने सध्या अकरावी बारावी विज्ञान शाखेत करून भविष्यात विज्ञान शाखेतच पदवी प्राप्त करून नंतर प्रशासकीय सेवेत जाऊन देश सेवा करण्याचा संकल्प व्यक्त केलातीची आई गृहिणी तर वडील अल्प भूधारक शेतकरी आहेत. नियमित सहा तास अभ्यास करून मला यश संपादन करता आले.आई वडील यांची प्रेरणा माझे मुख्याध्यापक, वर्ग शिक्षक विषय शिक्षक यांचे माझ्या यशात मोठा वाटा आहे.