चंदिगड,दि.०७(वृत्तसंस्था)- हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदार संघातून नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या भारतीय सिनेमा सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री कंगना रनौतच्या कानपट्ट्या शेकण्यात आल्याने देशभरात एकच खळबळ उडाली आहे.कुलविंदर कौर असे त्या सीआयएसएफ च्या महिला जवानाचे नाव असून तिने चंदिगढ विमानतळावर हा प्रकार केल्याचे वृत्त विविध वाहिन्यांवर दाखविल्या जात आहे. नवनिर्वाचित भाजपा खासदार कंगना रनौत चंदिगढ विमानतळावरून दिल्लीला जाण्यासाठी आली असता अचानक हा प्रकार घडला आहे.
ये प्रधानमंत्री की प्रेस कॉन्फ्रेंस का नजारा नहीं है।
ये कांग्रेस मुख्यालय है। कांग्रेस सांसद राहुल गांधी प्रेस कॉन्फ्रेंस करने वाले हैं। pic.twitter.com/Fww80fMpEu
— Krishna Kant (@kkjourno) June 6, 2024
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पंजाब हरियाणा मधील शेतकरी आंदोलन करीत असताना कंगना रनौतने आक्षेपार्ह वक्तव्य केले होते आणि त्याठिकाणी सदरहू महिला जवान हीची आई सुद्धा आंदोलन करीत असल्यामुळे तिच्या भावना दुखावल्याने तिने हे कृत्य केल्याचे नंतर त्याठिकाणी उपस्थित मीडियाच्या प्रतिनिधींना उद्देशून सांगितल्याचे या वाहिन्यांवर दाखविण्यात येत आहे.