अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादीचे आमदार आव्हाड निलंबित

0
13

नागपूर- विधानसभेत गोंधळ घालत अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. शेतक-यांना देण्यात येणा-या पॅकेजच्या मुद्यावरून आव्हाडांनी वेलमध्ये येऊन गोंधळ घातला तसेच काही अपशब्द उच्चारले. त्यामुळे सभापतींनी त्यांच्यावर ही कारवाई केली आहे.

शुक्रवारी दुष्काळग्रस्त शेतक-यांसाठी सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देत असताना जितेंद्र आव्हाड वेलमध्ये आले व त्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. तसेच काही अपशब्दही उच्चारले. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले.

आव्हाडांच्या निलंबनांच्या निषेधार्थ काँग्रेस – राष्ट्रवादीने सभात्याग केला असून आज सभागृहात होणा-या कामकाजात दोन्ही पक्षांचे आमदार सहभागी होणार नाहीत.