32.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News ‘या’ सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ?महाराष्ट्रावर ७,८२,९९१ कोटींचं कर्ज

‘या’ सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ?महाराष्ट्रावर ७,८२,९९१ कोटींचं कर्ज

0
298

blank

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया

मुबई :-आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन महायुती सरकारने अनेक लोकप्रिय घोषणा सुरू केल्या आहेत. याचाच भाग म्हणून आता लाडकी बहिण योजनेनंतर लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनांची बुधवारी पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली.या योजनेअंतर्गत राज्यातील युवांसाठी १२ वी उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ६००० रूपये, डिप्लोमा ८००० रूपये, तर पदवीधर १०,००० रूपये स्टायपेंट म्हणून देणार आहेत. यावरून विरोधकांनी महायुतीवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. यातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया महायुतीवर टिका केलीय.

सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ? असा सवाल अंजिला दमानिया यांनी केला आहे. ७,८२,९९१ कोटींचं कर्ज महाराष्ट्रावर आहे. कर्जबाजारी करून ठेवलं आहे. राज्य आणि आता मतांसाठी हा फालतुपणा आहे. राज्यात मोठमोठे उद्योग आणा. लोकांना नोकऱ्या द्या. भीक नाही. असा शाब्दिक टोला देखील अंजली दमानिया यांनी केलाय.

दरम्यान, पुण्यात मोती बागेत शरद पवारांच्या उपस्थितीत अजित गव्हाणे यांनी शरद पवार गटात जाहीर प्रवेश केलाय. अजित गव्हाणे यांच्यासह अजित पवार गटातील माजी नगरसेवकांनीही अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांचा हात धरला आहे. यावरून हे सगळे आज इथे उद्या तिथे. ह्या लोकांना फक्त सत्ता हवी. येणारी विधानसभा महाविकास आघाडी जिंकण्याची शक्यता जास्त म्हणून तिकडे. ना त्यांना तत्व आहेत, ना निष्ठा असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय.

blank