40.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home राजकीय पुण्यात २१ जुलैला भाजपचे अधिवेशन,राज्यात संवाद यात्रा

पुण्यात २१ जुलैला भाजपचे अधिवेशन,राज्यात संवाद यात्रा

0
77

blank

मुंबई:-भाजपने विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीला वेगाने सुरुवात केली असून पक्षाचे १९ वरिष्ठ नेते राज्यभरात संवाद यात्रा काढणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपचे पुण्यात २१ जुलै रोजी पुण्यात अधिवेशन होणार असून त्यात संवाद यात्रेची रुपरेषा ठरविण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

ही यात्रा राज्यातील २८८ विधानसभानिहाय काढण्यात येणार असून प्रत्येक जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका क्षेत्रातही जाणार आहे. तर पुण्यातील प्रदेश कार्यकारिणीच्या रविवारच्या अधिवेशनामध्ये आगामी धोरणे आणि दिशांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी यांच्यासह अन्य प्रमुख नेते पाच हजार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

blank