‘एनए’साठी पूर्वपरवानगीची यापुढे अट रद्द

0
14
वाढदिवसाच्या शुभेच्छा

नागपूर – जमिनीच्या अकृषक वापराकरिता आवश्यक असलेली जिल्हाधिका-यांच्या परवानगीची अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे भोगवटादार वर्ग १ म्हणून धारण केलेल्या कोणत्याही जमिनीच्या वापराचे रूपांतरण करण्यासाठी आता जिल्हाधिका-यांच्या पूर्वपरवानगीची आवश्यक्यता असणार नाही. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मध्ये सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत गुरुवारी एकमताने मंजूर करण्यात आले. मात्र, नियोजन प्राधिकरण, जमिनीचा वर्ग, तिचा भोगवटा आणि जमिनीवर कोणताही भार असल्यास संबंधित महसुली अधिका-यांकडून खातरजमा केल्यानंतरच त्या जमिनीच्या विकासाला परवानगी देण्यात येणार आहे, असे विधेयकात नमूद करण्यात आले आहे.

पुणे विद्यापीठाला फुलेंचे नाव : राज्यात मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणा-या सावित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विद्यापीठाला देण्यात आले आहे. याबाबत नामविस्तार करणारे विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यापीठ कायद्यात नामविस्ताराची सुधारणा करणारे हे विधेयक विधानसभेत मांडले. त्यामुळे आता यापुढे पुणे विद्यापीठ हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या नावाने ओळखले जाणार आहे.