एनओसी हवी,द्या पैसे

0
12
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया-कुठल्याही प्रकल्पासाठी वा इतर कामासाठी काही नाहरकत प्रमाणपत्राची गरज असते,परंतु सध्या बँक असो कि शासकीय कायर्लालयामध्ये खुलेआम नाहरकरत प्रमाणपत्रासाठी पैशाची मागणी होऊ लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भष्टाचारमुक्त प्रशासनाचा नारा गोंदियात तरी पुर्ण होण्याची शक्यता नाही.
जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बघोली गावानजीक सुरु होणार्या नव्या पेट्रोलपंपाकरीता शासनाच्या विविध विभागाच्या नाहरकर प्रमाणपत्राची गरज असते.त्या प्रमाणपत्रासाठी पेट्रोलपंपधारक मालकाने गोंदिया जिल्हा परिषदेतील पाणी पुरवठा विभागाकडे सुध्दा अर्र्ज केला होता.त्या अर्जदाराला नाहरकरत प्रमाणपत्र तर देण्यात आले.परंतु एनओसी दिल्यानंतरही पैशाची मागणी एका अभियंत्याने केल्याची चर्चा समोर आली आहे.संबधिताला वारंवार दुरध्वनी करण्यात येत असल्याचेही प्रकरण समोर आले आहे.गोंदियात तर काही वरिष्ठांनीही आपले दर अड्डीच टक्के स्वतच ठरविल्याची चर्चा आहे.