*सर्व गाठीभेटी केल्या रद्द?*
मुंबई:-विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर महायुतीत मुख्यमंत्रिपद भारतीय जनता पक्षालाच जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाले आहेत. आपली नाराजी त्यांनी पक्षाच्या आमदारांपर्यंत पोहोचवलेली आहे. सायंकाळ नंतरच्या सगळ्या गाठीभेटी त्यांनी रद्द केल्या आहेत, असे समजते आहे.
वर्षावर पोहोचलेल्या शिवसेनेच्या आमदारांदेखील शिंदे भेटलेले नाहीत. मुख्यमंत्रिपद जाणार असल्यानं शिंदेंचे आमदारदेखील नाराज झाले आहेत. अशी माहिती मिळत आहे. महायुतीला शिंदेंच्या नेतृत्त्वात विधानसभेत नेत्रदीपक यश मिळाल्यानं मुख्यमंत्रिपद त्यांच्याचकडे ठेवण्यात यावं, अशी शिवसेना आमदारांची आग्रही मागणी होती. पण ती पूर्ण होताना दिसत नाही. पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झालेलं आहे. त्यामुळे शिंदे नाराज झाले आहेत. मुख्यमंत्रिपदी कायम राहण्यासाठी एकनाथ शिंदे गेल्या ३६ तासांपासून भाजपच्या नेतृत्त्वाशी वाटाघाटी करत होते. भाजपनं १३२ जागा जिंकल्यानं आमदार, नेत्यांचा मुख्यमंत्रिपदासाठी दबाव वाढलेला आहे.
मागील ५ वर्षे सर्वाधिक आमदार असलेला पक्ष असूनही भाजपला मुख्यमंत्री मिळालं नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्रिपद सोडू नये, अशी राज्य भाजपमधील नेत्यांची भूमिका आहे. त्यांच्या भावना समजून घेत पक्षानं मुख्यमंत्रिपद न सोडण्याची ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज झाले आहेत. संध्याकाळी दिल्लीतून मेसेज आल्यानंतर एकनाथ शिंदेंनी त्यांचे सगळे नियोजित कार्यक्रम रद्द केले. संध्याकाळनंतरच्या त्यांच्या सगळ्या गाठीभेटी रद्द करण्यात आल्या. वर्षावर पोहोचलेल्या स्वपक्षीय आमदारांनादेखील ते भेटलेले नाहीत. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना प्रचंड आग्रही आहे. त्यासाठी शिंदे निकाल लागल्यापासून भाजप नेतृत्त्वाशी बोलत होते, अशी माहिती मिळत आहे.
तर आज शिवसेनेचे अनेक आमदार, माजी मंत्री सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. पण या सगळ्याचा शिवसेनेला काहीही फायदा होताना दिसत नाही. महायुतीत भाजपला १३२, शिवसेनेला ५७ आणि राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या आहेत. भाजप बहुमताच्या अगदी जवळ पोहोचल्यानं संख्याबळाच्या खेळीत मित्रपक्षांचं महत्त्व कमी झालेलं आहे. त्यातच राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना थेट पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेची मोठी गोची झाली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडून मुख्यमंत्रिपदाबद्दलचा फैसला जाहीर करण्यात येईल. नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव तेच घोषित करतील.