देवळी पेंढरी नाजीक ट्रॅव्हल्स पलटी झाल्याने 19 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

0
119

वर्धा,दि.२६ः- नागपूर आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या देवळी – पेंढरी या गावानजीक असलेल्या घाटामध्ये ज्युनिअर महाविद्यालयाचे विद्यार्थी घेऊन वर्ध्यातून परत नागपूरला जात असलेल्या ट्रॅव्हल्सला अपघात झाला आहे. येथे जंगल घाटामध्ये ट्रॅव्हल्स पलटी झाली असल्याची माहिती आहे. यात एका 19 वर्षीय विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाला असून काही विद्यार्थी जखमी झाले आहे. ट्रॅव्हल्समध्ये 52 विद्यार्थी प्रवास करीत असल्याची माहिती आहे. यातील विद्यार्थी हे सरस्वती विद्यालय नागपूर येथील असल्याची माहिती समोर येते आहे. वर्ध्यात ट्रेंनिग साठी विद्यार्थी गेले असल्याची माहिती आहे.