नवी दिल्ली : अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाचे (Nasa) प्रशासक बिल नेल्सन यांनी नासाच्या २०२५ मधील ‘आर्टेमिस’ या चांद्रयान मोहिम प्रक्षेपणाला विलंब लागू शकतो. १९७२ नंतर प्रथमच चंद्र मोहिम पुढे ढकलली आहे. आगामी आर्टेमिस II मिशन (Artemis 2), ज्याचे उद्दिष्ट चार अंतराळवीरांना चंद्राभोवती उड्डाणावर पाठवायचे आहे, आता ही मिशन एप्रिल २०२६ मध्ये निश्चित केली आहे. तर त्यानंतरचे आर्टेमिस III चंद्र लँडिंग मिशन २०२७ च्या मध्यामध्ये होणार असल्याचे नासाकडून सांगण्यात आले आहे.
पूर्वी नियोजित वेळेपेक्षा एक वर्ष उशीरा ‘या’ नासाच्या चंद्र मोहिमा प्रक्षेपित होणार आहेत. नासा मुख्यालयातील पत्रकार परिषदेदरम्यान, नेल्सन यांनी नासाच्या चंद्र मोहिम विलंब होण्याला ओरियन क्रू कॅप्सूलच्या उष्मा शील्डसह निर्माण झालेल्या समस्या कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. २०२२ मध्ये त्याच्या अनक्रिव्ह चाचणी फ्लाइट दरम्यान नुकसान झाल्याचेदेखील म्हटले आहे.