राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. कित्येक दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? तसेच कोणत्या नेत्याला कोणंत खातं मिळणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. मात्र अखेर मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या रविवारी म्हणजेच 15 डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात महायुतीचे 34 ते 35 मंत्री शपथ घेणार असल्याचं बोललं जात आहे. यामध्ये भाजपचे 23 मंत्री, शिवसेना शिंदे गटाचे 13 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 9 मंत्री असणार असण्याची शक्यता आहे.
त्यातच पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील आमदारांची नो एंट्री राहणार आहे.केंंद्रात प्रफुल पटेलांना मंत्रीपद हवे असल्याने गोंदिया जिल्ह्यातील त्यांचे एकमेव आमदार राजकुमार बडोलेंना मंत्रीपदापासून वंचित रहावे लागणार असल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत.भाजपलाही बडोलेंचा समावेश मंत्रिमंडळात नको असल्याची माहिती आतल्या गटातून आली आहे.तर भाजपमध्ये सुध्दा मंत्रिमंडळाच्या दुसर्या विस्तारात आश्चर्यचकीत करणारा नाव समोर येणार असल्याचे बोलले जाते.पहिल्या यादीत गोंदिया-भंडाराचा समावेश नसल्याने प्रफुल पटेल पुन्हा एकदा पार्सल पालकमंंत्री गोंदिया जिल्ह्यावर थोपवून विकासाच्या वाटेत खोडा घालणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
भाजप पक्षाचे संभाव्य मंत्री :
चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
चंद्रशेखर बावनकुळे
प्रवीण दरेकर
मंगलप्रभात लोढा
बबनराव लोणीकर
शिवेंद्रराजे भोसले
नितेश राणे
पंकजा मुंडे
आशिष शेलार किंवा योगेश सागर
संभाजी निलंगेकर
जयकुमार रावल
विजयकुमार गावित
देवयानी फरांदे किंवा राहुल आहेर
राहुल कुल
माधुरी मिसाळ
संजय कुटे
शिवसेना शिंदे गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी :
दादा भुसे
शंभूराज देसाई
गुलाबराव पाटील
उदय सामंत
मंगेश कुडाळकर
अर्जुन खोतकर
आशिष जैस्वाल
प्रताप सरनाईक
प्रकाश सुर्वे
योगेश कदम
भरत गोगावले
संजय शिरसाट
राजेश क्षीरसागर
बालाजी किणीकर
प्रकाश आबिटकर
राष्ट्रवादी काँग्रेस संभाव्य यादी
अजित पवार
आदिती तटकरे
छगन भुजबळ
दत्ता भरणे
धनंजय मुंडे
अनिल भाईदास पाटील
नरहरी झिरवळ
संजय बनसोडे
संग्राम जगताप
सुनिल शेळके
धर्मरावबाबा आत्राम