30.5 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News पॉपकॉर्नपासून ते जुन्या कारपर्यंत…सर्वसामान्यांवर मोदी सरकराचा महागाई बॉम्ब, जीएसटीचा मारा

पॉपकॉर्नपासून ते जुन्या कारपर्यंत…सर्वसामान्यांवर मोदी सरकराचा महागाई बॉम्ब, जीएसटीचा मारा

0
119

blank

राजस्थानमधील जैसलमेर येथे जीएसटी परिषदेची 55वीं बैठक झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या नेतृत्वात ही बैठक झाली. यामध्ये जीएसटी दराबाबत फेरविचार झाला. तर काही वस्तूंवरील जीएसटी कायम ठेवण्यात आला. तर काही वस्तूंवर जीएसटी लावण्यात आला आहे. एकीकडे कर्जावरील व्याज दरात कपात होत नसताना मोदी सरकारने पुन्हा एकदा महागाईचा बॉम्ब टाकला आहे. विमा क्षेत्रात जीएसटी कपातीचा निर्णय घेण्याच्या आग्रही मागणीला सुद्धा जीएसटी परीषदेने वाटण्याच्या अक्षता लावल्याने देशभरात नाराजीचा सूर आळवला गेला.पॉपकॉर्न सुद्धा सोडले नाही

फोर्टिफाईड तांदळावरील कर रचना परिषदेने अजून सुटसुटीत केली. जीएसटी परिषदेने त्यावर 5% जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला. त्याचा वापर कोणताही पदार्थ तयार करण्यासाठी होत असेल तरी रेडी टू इट पॉपकॉर्नवर कर द्यावा लागणार आहे. साधे पॉपकॉर्न ते मसाला पॉपकॉर्न, पॅकेज्ड अथवा लेबल लावलेले नसतील तर त्यावर 5% जीएसटी मोजावा लागणार आहे. तर पॅकेज्ड आणि लेबल लावलेल्या पॉपकॉर्नसाठी 12% जीएसटी द्यावा लागणार आहे. तर साखर आणि कॅरमेलपासून तयार पॉपकॉर्नसाठी सर्वाधिक 18% जीएसटी मोजावा लागेल.

काय झाली चर्चा
GST परिषदेची 55 वी बैठक शनिवारी झाली. या बैठकीत आरोग्य आणि जीवन विम्यावरील प्रीमियमबाबतचा प्रस्ताव आला. परंतु त्यावर निर्णय टाळला. परिषदेने म्हटले की, त्यावर अजून स्पष्टीकरणाची गरज आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आरोग्य विम्यावरील जीएसटी रद्द करण्याची मागणी अर्थमंत्र्यांकडे केली होती. त्यानंतर मंत्री गटाने हा प्रस्ताव जीएसटी बैठकीत मांडला. त्यावेळी त्यासंदर्भात अधिक व्यापक माहिती देण्याचे परिषदेत सांगण्यात आले. त्यामुळे विम्यावरील प्रीमियम कमी करण्याचा प्रस्तावावर कोणताही निर्णय झाला नाही.

किती आहे विम्यावर जीएसटी रेट्स?
आरोग्य विमा, जीवन विमा आणि यूनिट लिंक्ड इंश्योरेंन्सवर सध्या 18 टक्के जीएसटी आहे. एंडोमेंट प्लॅनमध्ये जीएसटी वेगळा आहे. त्यात पहिल्या वर्षी 4.5 दुसऱ्या वर्षी 2.25 टक्के जीएसटी आहे. जीवन विम्यावर सिंगल प्रीमियम एन्युटी पॉलिसीवर 1.8 टक्के जीएसटी दर आहे. हे दर सर्व वयाच्या व्यक्तींसाठी सारखे आहे.

blank